करिनानं साराला 'वन नाइट स्टँड' बाबत केला प्रश्न!, सारानं दिलं 'हे' उत्तर

साराचा चित्रपट 'लव आज कल'  १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा करिनाचा रेडिओ शोच्या सेटवर पोहोचली. या सेटवर विचारलेल्या प्रश्नांमुळे हा एपिसोड चर्चेत आला आहे.

On the question of 'One Night Stand', sara gave this answer!
 करिनानं साराला 'वन नाइट स्टँड' बाबत केला प्रश्न!, सारानं दिलं 'हे' उत्तर  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • करीनाच्या रेडिओ शोमध्ये साराची उपस्थिती
  • करीनानं साराला विचारले खाजगी प्रश्न
  • वन नाईट स्टॅंड वर सारानं स्वत:च मत मांडल

मुंबई :  बॉलिवूडची अभिनेत्री सारा अली खानचा चित्रपट 'लव आज कल'  १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा करिनाच्या रेडिओ शोच्या सेटवर पोहोचली. या सेटवर विचारलेल्या प्रश्नांमुळे हा एपिसोड चर्चेत आला आहे. करिनानं साराला खूप सारे प्रश्न विचारले, यातील वन नाइट स्टॅंड या प्रश्नाच्या उत्तरानं दोघी सुद्धा अवघडल्या होत्या, परंतु सारानं याचं योग्य ते उत्तर दिलं. करिनानं साराला खासगी आयुष्यावर अनेक प्रश्न विचारले, त्यावर सारानं देखील बिनधास्तपणे उत्तरं दिलं.

सारा सध्या 'लव आज कल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं १४ फेब्रुवारीला प्रदर्शीत होणार आहे. हा चित्रपट साराचे वडील सैफ अली खानचा चित्रपट 'लव आज कल'चा सिक्वेल आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. शो दरम्यान करिनानं साराला अनेक खासगी प्रश्न विचारले, तिला तिच्या अफेयर्सबद्दल देखील विचारण्यात आले. 

 

https://www.instagram.com/p/B7_AF4-FA2D/?utm_source=ig_web_copy_link


असाच एक प्रश्न विचारताना करीनानं म्हटलं आहे, की आपण एका आधुनिक परिवारात जन्मलेलो आहोत, त्यामुळे हा प्रश्न मी विचारते आहे. माहीत नाही की हा प्रश्न विचारला पाहिजे की नाही, परंतु मी विचारते आहे आणि करिनानं साराला वन नाईट स्टँड? वर प्रश्न विचारला. या प्रश्नावर दोघीही अवघडल्या अवस्थेत एकमेकींकडे पाहू लागल्या.  पण नंतर साराने या प्रश्नाचं उत्तर दिले, ती म्हणाली,  मी कधीही याबाबत विचार केला नाही आणि अशी वेळ देखील माझ्यावर आली नाही. मी ते कधीही करणार नाही असं सारानं सांगितलं, तेव्हा करीनानं हूश्श.. करत मोकळा श्वास देखील सोडला. त्यानंतर कधी कोणासोबत नॉटी चॅट केल आहेस का? करिनाच्या या प्रश्नावर सारानं हो अस उत्तर दिलं तेव्हा करिनानं सैफला हे सांगणार आहे असा दम साराला दिला. साराला करिनानं विचारल की तू कधी कोणाला धोका दिला आहेस का? यावर सारानं नाही अस प्रांजळपणे कबूल केलं.

यांसारखे अनेक प्रश्न साराला विचारण्यात आले आणि सारानं देखील तितक्याच दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. शोचा हा व्हिडिओ यूट्यूबवर येताच सारा आणि करिनाच्या चाहत्यांकडून लाखो लाईक्स मिळाले आहेत. या अगोदर कार्तिक आर्यन देखील या शोमध्ये आला होता. तेव्हा करिनानं त्याला साराबद्दल विचारलं होतं. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी