Aishwarya Rai Bachchan In Cannes Film Festival 2022: पुन्हा एकदा रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय-बच्चनचाच जलवा, ऐश्वर्याकडून शिकण्याचा दीपिकाला सल्ला

बी टाऊन
Updated May 19, 2022 | 16:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aishwarya Rai Bachchan In Black Gown In Cannes Film Festival 2022: माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा कान्समधून फर्स्ट लूक समोर आला आहे, तिचा हा लूक पाहिल्यानंतर लोकं तिची प्रशंसा करताना थकत नाहीत.

Once again, Aishwarya Rai Bachchan is on the red carpet,
रेड कार्पेटवर छा गयी ऐश्वर्या राय-बच्चन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कान्सच्या रेडकार्पेटवर ऐश्वर्या राय-बच्चनचा जलवा
  • ऐश्वर्याचे हटके लूकने जिंकली चाहत्यांची मनं
  • फॅशन हाऊस ऑफ Dolce & Gabbanaयांनी डिझाइन केलेला ऐश्वर्याचा रेडकार्पेट लूक

Aishwarya Rai Bachchan In Black Gown In Cannes Film Festival 2022: कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022', (Cannes Film Festival 2022) ज्याची गणना सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या कार्यक्रमांमध्ये केली जाते, जगभरातील सौंदर्यवतींनी इथे हजेरी लावली आहे, परंतु रेड कार्पेटवर प्रेक्षक जिची आतुरतेने वाट पाहात होते, ती आहे, माजी मिस वर्ल्ड, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan Photos Cannes 2022).  याचे कारण म्हणजे मिसेस बच्चनचा मोहक आणि स्टायलिश लूक नेहमीच कान्सच्या रेड कार्पेटवरून चर्चेत असतो. यावेळीही नेमके तेच घडले.


17 मे ते 28 मे दरम्यान चालणाऱ्या 75 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगातील सर्वात सुंदर महिलेने आपला जलवा दाखवला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय बच्चनने  (Aishwarya Rai Bachchan) केवळ तिच्या सौंदर्याने कार्यक्रमाला शोभा आणलेली नाही तर तिच्या या स्टाईलने फोटोग्राफर्समध्येही तिचे फोटोज कॅमेरात कैद करण्यासाठी स्पर्धा लागली होती.


कान्समध्ये ऐश्वर्याच्या ग्लॅमरचा जलवा


कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये ऐश्वर्या राय-बच्चनच्या ग्लॅमरस अंदाज रेड कार्पेटवर दिसत होता. तिच्यापासून नजर हटवणे सगळ्यांनाच अवघड झाले होते. यादरम्यान अभिनेत्रीने अतिशय सुंदर कपडे परिधान केले होते, ज्यामध्ये ती जिवंत बार्बी डॉलसारखी दिसत होती.

आतापर्यंतच्या ऐश्वर्याच्या कान्समधील लूकपेक्षा तिचा हा लूक पूर्णपणे वेगळा होता. डोक्यापासून पायापर्यंत, अॅशच्या लूकमध्ये असे काहीही नव्हते
जे खूप जास्त किंवा मेंटेन करणे कठीण वाटत होते.

ऐश्वर्याचे एकाहून एक सरस फोटो


ऐश्वर्याने इटालियन लक्झरी फॅशन डिझायनर डोमेनिको डोल्से (Domenico Dolce) आणि स्टेफानो गब्बाना (Stefano Gabbana) यांच्या फॅशन हाउस Dolce & Gabbana यांनी डिझाइन केलेला 3D कस्टम फिट गाऊन परिधान केला होता. हा एक प्रकारचा वॉल्यूमिनस सिल्हूट होता, ज्याचा पॅटर्न, फिगर हगिंग असा आहे. ऐश्वर्याच्या गाऊनचा वरचा भाग स्किनफिट केलेला असताना, त्याला हेमलाइनवर बॉलरूम लूक देण्यात आला होता, जो अभिनेत्रीच्या कर्व्ही फिगरला हायलाइट करण्याचे उत्कृष्ट काम करत होता. डिझायनरने स्टाईल कोशंटसाठी ऑफ-शोल्डर टचसह डीप-कट नेकलाइन दिलेली होती. 

 ऐश्वर्याचा लूक सगळ्यांवर भारी 

Dolce & Gabbana फॅशन हाऊसने खास ऐश्वर्यासाठी स्टाईल केलेल्या गाऊनमध्ये डीप-कट नेकलाइन, स्टाईल कोशंटसाठी ऑफ-शोल्डर टच देण्यात आला होता आउटफिट वेगवेगळ्या रंगीत टूल्सने बनवलेल्या 3D फ्लोरल मोटिफ्सने सजवले होते, जे काळ्या रंगासह पॉपअप जोडण्यासाठी काम करत होते.


यामुळे अभिनेत्रीचा लूक केवळ स्टायलिश लुकच बनला नाही तर या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिचे वय देखील लपविल्याचे दिसून आले. ऐश्वर्याचा पेहराव अप्रतिम होता यात शंका नाही पण तीने त्यात दाखवलेल्या आत्मविश्वासाने तिला अतिशय आकर्षक बनवले.


मेकअपसुदधा एकदम परफेक्ट

तिचा लुक पूर्ण करण्यासाठी, ऐश्वर्या राय बच्चनने गुलाबी ग्लॉसी लिपस्टिकसह बीमिंग हायलाइटर, नाट्यमय डोळे, चमकदार आयशॅडोसह न्यूड मेकअप केला होता. मधल्या पार्टिंग स्टाईलमध्ये तिने केस मोकळे सोडले होते. या आउटफिटसोबत ऐश्वर्याने कोणतेही दागिने घातले नव्हते. तिने कानात फक्त झुमके घातले होते, त्यामुळे लोकांचे सर्व लक्ष तिच्या आऊटफिटकडे आणि तिच्याकडे जात होते

रेड कार्पेटच्या पहिल्याच दिवशी ऐश्वर्याने इतर सौदर्यवतींपेक्षा पूर्णपणे वेगळा लूक केला होता. त्यामुळे इतक्या सुंदर लूकमध्ये पाहून तिचे चाहते तिचे कौतुक करताना थकले नाहीत. या हेवी प्लीट्स गाऊनमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य पाहून एक यूजर म्हणाली- 'आ गई कान्स की रानी', तर एकाने लिहिले 'तुला कोणी हरवू शकत नाही'. तर एकाने 'दीपिकाने काहीतरी शिकावे' असे सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी