भाऊ बनला प्रेमात अडसर, अभिनेत्रीने केले भावाचे तुकडे-तुकडे करून घेतला जीव? 

Shanaya Katwe । कन्नड अभिनेत्री शनाया कटवेवर तिच्या भावाच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी अभिनेत्रीला अटक केली आहे. तसेच आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.   

ondu ghanteya kathe actress shanaya katwe arrested in connection to brother rakesh katwes murder case
अभिनेत्रीने केले भावाचे तुकडे-तुकडे करून घेतला जीव?  

थोडं पण कामाचं

  • कन्नड अभिनेत्री शनाया कटवे  हिच्यावर आपल्याच भावाच्या हत्येचा गंभीर आरोप होत आहेत.
  • 'Ondu Ghanteya Kathe' या चित्रपटात दिसलेल्या या अभिनेत्रीवर तिच्या भावाच्या हत्येचा आरोप आहे.
  • तिचा 32 वर्षीय भाऊ राकेश कटवे याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 Shanaya Katwe ।  नवी दिल्ली :   कन्नड अभिनेत्री शनाया कटवे  (Shanaya Katwe) हिच्यावर आपल्याच भावाच्या हत्येचा गंभीर आरोप होत आहेत. 'Ondu Ghanteya Kathe' या चित्रपटात दिसलेल्या या अभिनेत्रीवर तिच्या भावाच्या हत्येचा आरोप आहे. तिचा 32 वर्षीय भाऊ राकेश कटवे याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शनायाला गुरुवारी हुबळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयीन कोठडी सुनावली. ( actress shanaya katwe arrested in connection to brother rakesh katwes murder case ) 

तुकडे-तुकडे झालेला मृतदेह सापडला

याप्रकरणी पोलिसांनी शनाया कटवेचा (Shanaya Katwe) प्रियकर नियाज अहमद यालाही अटक केली आहे. यासह आणखी तीन जणांना अटकही करण्यात आली आहे. यात 21 वर्षीय तौसिफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरानीवाले यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, राकेशचे डोके देवरगुडीहलच्या वनक्षेत्रात सापडले होते आणि त्याच्या शरीराचे इतर भागांचे तुकडे केले होते.  ते गडग रोड आणि हुबळीच्या इतर भागात आढळले होते. 

अशी झाली हत्या 

हुबळी येथील शनाया कटवे आणि राकेश यांच्या घरी या भीषण घटनेला अंतीम रूप देण्यात आले. असे  अहवालात समोर आले आहे. असे म्हणतात की, राकेशची गळा आवळून खून करण्यात आला होता. वृत्तानुसार, तपासणी दरम्यान अधिकाऱ्याला राकेशच्या हत्येची लिंक स्वतःची बहीण शनाया ही मिळाली, अशी माहिती मिळाली आहे. शनाया हा आरोपी नियाज अहमद कटिगार याच्या प्रेमात असल्याचेही सांगण्यात आले.

कधी झाली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार शनाया कटवे यांचे नियाज अहमद कटिगार नावाच्या युवकाशी प्रेमसंबंध होते, त्याला शनायाचा भाऊ राकेश कटवे याला हे पसंत नव्हते. राकेशने या नात्याला स्वीकार केले नव्हते.  अशा परिस्थितीत शनायाने तिच्या प्रियकरासह आपल्या भावाला ठार मारण्याची योजना आखली. 9 एप्रिलला शनाया तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळीला आली होती. दरम्यान, आरोपी नियाजने राकेशला त्याच्या तीन मित्रांसह ठार केले. नियाज आणि त्याचे साथीदार हुबळी येथील राकेशच्या घरी पोहोचले आणि तेथेच त्यांनी गळा दाबला. यानंतर नियाज आणि त्याच्या साथीदारांनी मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी