'वन माइक स्टँड'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित

'अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ'च्या 'वन माइक स्टँड'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

One Mic Stand Season 2
'वन माइक स्टँड'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित 
थोडं पण कामाचं
  • 'वन माइक स्टँड'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित
  • सीरिजचा प्रिमिअर २२ ऑक्टोबर २०२१ रोजी 'अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ'च्या माध्यमातून २४० देशांमध्ये होईल
  • स्टँड अप कॉमेडी

मुंबईः 'अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ'च्या 'वन माइक स्टँड'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला. निर्माता दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री सनी लिओनी, लेखक चेतन भगत, पत्रकार फेय डिसूझा आणि गायक-रॅपर रफ्तार हे कलाकार 'वन माइक स्टँड'च्या दुसऱ्या सीझनमध्ये स्टँड अप कॉमेडी करणार आहेत. या सीरिजचा प्रिमिअर २२ ऑक्टोबर २०२१ रोजी 'अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ'च्या माध्यमातून २४० देशांमध्ये होईल. One Mic Stand Season 2

अबीश मॅथ्यू, अतुल खत्री, समय रैना, सुमुखी सुरेश आणि पलटासारखे प्रतिभावान विनोदी कलाकार 'वन माइक स्टँड'च्या दुसऱ्या सीझनमध्ये स्टँड अप कॉमेडीसाठी अनुक्रमे चेतन भगत, फेय डिसूझा, रफ्तार, करण जोहर आणि सनी लिओनी यांना मार्गदर्शन करताना दिसतील.

'वन माइक स्टँड'च्या दुसऱ्या सीझनचे क्रिएटर आणि होस्ट सपन वर्मा म्हणाले की, पहिल्या सीझनला दर्शकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे उत्साह वाढला आणि दुसऱ्या सीझनची निर्मिती केली. हा सीझन लोकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या सीझनमध्ये असे सेलिब्रेटी आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रात छान कामगिरी केली आहे. आता ते एक वेगळा प्रयोग म्हणून स्टँड अप कॉमेडी करत आहेत. दुसऱ्या सीझनसाठी अनुभवी अनुभवी स्टँड अप कॉमेडिअन सेलिब्रेटींना स्टँड अप कॉमेडीसाठी मार्गदर्शन करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी