दिवाळखोरीच्या मार्गावर आहे आदित्य नारायण, बँक अकाऊंटमध्ये उरलेत फक्त इतके पैसे

बी टाऊन
Updated Oct 15, 2020 | 13:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aditya Narayan: सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलचा होस्ट आदित्य नारायणने सांगितले की लॉकडाऊनमध्ये त्याची सगळी सेव्हिंग्स संपली. जर त्याने ऑक्टोबरमध्ये काम सुरू केले नाही तर त्याला आपली बाईक विकावी लागेल.

aditya narayan
आदित्य नारायणच्या बँक अकाऊंटमध्ये उरलेत फक्त इतके पैसे 

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊनमध्ये दिवाळखोरीच्या मार्गावर इंडियन आयडॉलचा होस्ट आदित्य नारायण
  • आदित्यने सांगितले की बँक अकाऊंटमध्ये उरलेत केवळ १८ हजार रूपये
  • आदित्यने सांगितले की काम सुरू नाही केले तर विकावी लागेल बाईक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता(bollywood actor), प्लेबॅक सिंगर आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायण(aditya narayan) लवकरच लग्नबंधनात(marriage) अडकत आहे. आदित्यने काही दिवसांपूर्वीच कन्फर्म केले की तो १० वर्षांपासून श्वेता अग्रवालला(shweta agrawal) डेट करत आहे आणि या वर्षाच्या अखेरीपर्यंततो लग्न करणार आहे. मात्र या खुशखबरीदरम्यानच आदित्य आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. आदित्यने सांगितले आहे की तो पूर्णपणे कंगाल होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान आदित्यने सांगितले की कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागला. त्याच्या अकाऊंटमध्ये आता केवळ १८ हजार रूपये उरले आहेत. बॉलिवूड बबलशी ोलताना त्याने सांगितले की सरकारने जर जीवन सोपे केले नाही तर लोक भुकेने मरतील. 

गुजारण करण्यासाठी केले हे काम

आदित्यने स्वत:बद्दल बोलताना सांगितले की त्याची संपूर्ण सेव्हिंग्स संपली आहे आणि गुजारण करण्यासाठी त्याने म्युच्युअल फंडमधून पैसे काढले आहेत. इतकंच नव्हे तर त्याने ऑक्टोबरमध्ये काम सुरू केले नाही तर खर्च करण्यासाठी त्याला आपली बाईक विकावी लागेल. 

आदित्य म्हणाला, जर सरकारने हा लॉकडाऊन वाढवला तर लोक भुकेने मरतील. कोणी हा विचार केला नसेल की ते एक वर्षापर्यंत काम करणार नाही मात्र त्यानंतरही आरामात जीवन व्यतीत करतील. जोपर्यंत तुम्ही करोडपती नाही आहात तोपर्यंत हे शक्य नाही. तुमच्याकडे कोणता पर्याय उरत नाही. माझ्या बँक अकाऊंटमध्ये केवळ १८ हजार रूपये उरले आहेत. जर मी ऑक्टोबरपासून काम सुरू केले नाही तर माझ्याकडे पैसे उरणार नाहीत. मला माझी बाईक विकावी लागेल. हे खरंच कठीण आहे. 

आदित्यने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की तो १० वर्षांपासून श्वेता अग्रवालला डेट करत आहे. नात्याच्या सुरूवातीला ते केवळ चांगले मित्र होते. तो म्हणाला, लग्न ही आमच्या दोघांमधील केवळ औपचारिकता राहिली आहे. आम्ही नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये लग्न करू शकतो. माझे आई-वडील श्वेताला ओळखतात. मला आनंद आहे की मला श्वेतासारखी पार्टनर मिळाली. दोघांनी शापित या सिनेमात एकत्र काम केले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी