Oscars 2023 Winners Full List : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर (Oscars 2023) ओळखला जातो. यंदाच्या वर्षीचा ऑस्कर अकादमी पुरस्कार 2023 आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (academy awards) लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये धामधुमीत पार पडला. हा सोहळा भारतासाठीही खास होता. एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाच्या 'नाटु नाटु' या गाण्याला ऑरिजनल सॉन्ग कॅटेगरीत पुरस्कार मिळाला आहे. (Oscar 2023 Winners Full List : Who won the award with 'Natu Natu'; Know the complete list of winners)
संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. ‘मी कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे’, असं किरावानी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी ऑस्कर जिंकल्यावर मंचावर गाणं म्हटलं.
अधिक वाचा : कलरफुल प्राजक्ता माळीची दिलखूश अदा
तर 'द एलिफेंट विस्पर्स' या चित्रपटाला बेस्ट शॉर्ट फिल्मसाठी ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे. 'ऑस्कर 2023' या पुरस्कार सोहळ्यात 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' (Everything Everywhere All at Once) या सिनेमाला ही हा पुरस्कार मिळाला आहे.
अधिक वाचा : पोरं अभ्यास करत नसतील तर पालकांनो करा या गोष्टी
सर्वोत्कृष्ट सिनेमा - एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर
सर्वोत्तम दिग्दर्शन : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'
बेस्ट फिल्म एडिटिंग : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'
बेस्ट साऊंड - टॉप गन: मेव्हरिक
बेस्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म- द एलिफंट व्हिस्परर्स
बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर
बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म - द एलिफंट व्हिस्पर्स
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल - द वेल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - जेम्स फ्रेंड
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - आयरिश गुडबाय
बेस्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म - नवलनी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – पिनोकियो