Oscars 2023: RRR रचणार इतिहास: जाणून घ्या भारतात कधी आणि केव्हा बघता येईल ऑस्कर पुरस्कार सोहळा

बी टाऊन
Updated Mar 12, 2023 | 21:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Natu-Natu Song : यंदाचा ऑस्कर सोहळा भारतासाठी खूप खास आहे, कारण राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील 'नटू नातू' या गाण्याला ऑस्कर नामांकन मिळाले आहे. ऑस्कर 2023 फक्त तीन दिवसांवर आहे. जाणून घ्या हा सोहळा कधी, कुठे आणि कोणत्या वेळी पाहायचा. 

Oscars 2023: Natu Natu on the Oscars race, know when and when to watch the Oscars
कुठे आणि कसा बघाल ऑस्कर सोहळा ?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • 'RRR' चित्रपटातील 'नटू नातू' या गाण्याला ऑस्कर नामांकन
  • ऑस्कर 2023 फक्त तीन दिवसांवर
  • Disney+Hotstar वर भारतातील दर्शकांसाठी अवॉर्ड शो थेट प्रक्षेपित केला जाईल.

Natu-Natu Song : यंदाचा ऑस्कर सोहळा भारतासाठी खूप खास आहे, कारण राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर नामांकन मिळाले आहे. ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा फक्त तीन दिवसांवर आला  आहे. हा पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. चला तर जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कोणत्या वेळी पाहता येणार. 

ऑस्कर सोहळा कधी प्रसारित होणार?

ऑस्कर 2023 रविवारी, 12 मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. भारतीयांना 13 मार्च IST रोजी पहाटे 5:30 वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

ऑस्कर कुठे बघायचे?

Disney+Hotstar वर भारतातील दर्शकांसाठी अवॉर्ड शो थेट प्रक्षेपित केला जाईल. हा कार्यक्रम ABC नेटवर्कच्या YouTube, Hulu Live TV, Direct TV, FUBO TV आणि AT&T TV यासह विविध प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असेल. ABC.com आणि ABC अॅपवरही दर्शक शो पाहू शकतात.

अधिक वाचा :ती आली, तिनं पाहिलं आणि... हार्ट अटॅकनंतर सुष्मिता उतरली रॅपवर

ऑस्कर 2023 चे आयोजन कोण करणार?

गेल्या वर्षी हा सोहळा रेजिना हॉल, एमी शुमर आणि वांडा सायक्स यांनी आयोजित केला होता. पण यंदा एकच यजमान असेल. यजमान आणि कॉमेडियन जिमी किमेल यंदाच्या ऑस्कर सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. या वर्षीच्या ऑस्कर सादरीकरणात, मायकेल बी. जॉर्डन, हॅले बेरी, हॅरिसन फोर्ड, पेड्रो पास्कल, फ्लॉरेन्स पग, अँड्र्यू गारफिल्ड, केट हडसन, दीपिका पदुकोण आणि लिटल मर्मेड स्टार हॅले बेली दिसणार आहेत.

दीपिका पदुकोण यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात दिसणार आहे

यंदाच्या ऑस्कर प्रेझेंटेशनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचा समावेश आहे. बॉलीवूड अभिनेत्रीला हा बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे. एमिली ब्लंट, सॅम्युअल एल जॅक्सन, ड्वेन जॉन्सन, मायकेल बी जॉर्डन, जेनेल मोने, झो सालडाना, जेनिफर कोनेली, रिझ अहमद आणि मेलिसा मॅककार्थी या अभिनेत्यांसोबत ती सादर करणार आहे. दरम्यान, दीपिकाने ऑस्करसाठी भारत सोडला आहे.

अधिक वाचा :​TJMM साठी रणबीरच्या तुलनेत श्रद्धाला मिळाली एवढी रक्कम, जाणून घ्या स्टार कास्टची फी​

यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास आहे

'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यंदा या गाण्याला भारताला ऑस्कर मिळेल, अशी अपेक्षा असल्याने भारतीय प्रेक्षकही ऑस्करसाठी उत्सुक आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे गाणे राहुल सिपलीगुंज आणि काळा भैरव ऑस्करच्या मंचावर लाइव्ह सादर करणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी