OTT Release this week: 'महारानी 2' ते 'दिल्ली क्राइम सीझन 2'या वेबसीरिज या आठवड्यात OTT वर रिलीज होणार आहे.

बी टाऊन
Updated Aug 23, 2022 | 18:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

OTT Release this week : विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा लायगर (Liger) या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, तर दुसरीकडे ओटीटीवरही (OTT relase in this week ) भरपूर मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Ott release web series in this week
'या' वेबसीरिज येत्या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'क्रिमिनल जस्टिस 3' ची प्रतीक्षा आता संपणार आहे.
  • दिल्ली क्राइम या लोकप्रिय वेबसीरिजचा दुसरा सीझन २६ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
  • हुमा कुरेशीच्या महारानी वेबसीरिजचा नवा सीझन लवकरच येत आहे.

OTT Release this week 23 August to 26 August: विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा लायगर (Liger) या आठवड्यात थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप पसंती दिली जात आहे. दुसरीकडे, ओटीटीवरही (OTT relase in this week ) मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. ज्या प्रेक्षकांना घरी बसून चित्रपट आणि कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी या आठवड्यात अनेक नवीन वेबसीरिज येणार आहेत. 
या आठवड्यात कोणती वेब सिरीज आणि चित्रपट रिलीज होणार आहे पाहूया. ( Ott release webseries in this week )

अधिक वाचा : 'या' डान्सरविरोधात लखनऊ न्यायालयाचे अटकेचे आदेश

Criminal Justice 3 

बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'क्रिमिनल जस्टिस 3' ची प्रतीक्षा आता संपणार आहे. क्रिमिनल जस्टिसचा हा नवा सीझन 'अधुरा सच ' या टॅगलाइनसह आला आहे, ज्यामध्ये पंकज त्रिपाठी वकील म्हणून माधव मिश्राच्या भूमिकेत दिसणार आहेत. या शोमध्ये पंकज त्रिपाठी व्यतिरिक्त श्वेता बसू प्रसाद, स्वस्तिका मुखर्जी, पूरब कोहली, आदित्य गुप्ता, देशना दुगड आणि गौरव गेरा देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. शोले दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा मुलगा रोहन सिप्पी दिग्दर्शित, हॉटस्टार स्पेशल 'क्रिमिनल जस्टिस: अधुरा सच 26 ऑगस्ट 2022 पासून रिलीज होणार आहे. हा शो बीबीसी स्टुडिओच्या सहकार्याने अॅप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित डिस्ने+ हॉटस्टार वर प्रसारित होईल.

Delhi crime season 2

शेफाली शाहची लोकप्रिय वेबसीरिज दिल्ली क्राइमचा दुसरा सीझन २६ ऑगस्टला रिलीज होत आहे. या सीझनमध्येही शेफाली शाह डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत दिसणार आहे. डीसीपी वर्तिका चतुर्वेदी आणि त्यांची टीम यावेळी सीरियल किलरच्या शोधात आहे. या सीझनमध्ये रसिका दुग्गलही नीती सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. 
याशिवाय राजेश तेलंग इन्स्पेक्टर भूपेंद्र सिंहच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिल्ली क्राइमचा पहिला सीझन दिल्ली गँगरेप प्रकरणावर आधारित होता.

अधिक वाचा : जागतिक वडा पाव दिनानिमित्त भन्नाट Memes व्हायरल

Maharani Season 2

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या महारानी वेबसीरिजचा नवा सीझन लवकरच येत आहे. हुमा कुरेशी आणि सोहम शाह यांच्याशिवाय महारानीमध्ये अमित सियाल, इनामुलहक, विनीत कुमार, मोहम्मद आशिक हुसेन, कानी कुसरुती आणि तनु विद्यार्थी यांच्याही भूमिका आहेत. याची निर्मिती जॉली एलएलबी आणि जॉली एलएलबी 2 फेम सुभाष कपूर यांनी केली आहे, तर करण शर्माने बहुतांश भागांचे दिग्दर्शन केले आहे. नवीन सीझन 25 ऑगस्टपासून Sony Liv वर उपलब्ध होईल.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी