Sanjay Chouhan : 'पान सिंह तोमर'च्या लेखकाचे 'या' आजारामुळे निधन

Paan Singh Tomar Writer Sanjay Chouhan Dies At The Age Of 62 After Suffering From Chronic Liver Disease : मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. 'पान सिंह तोमर' या सिनेमाचे लेखक संजय चौहान यांचे निधन झाले.

Paan Singh Tomar Writer Sanjay Chouhan Dies
'पान सिंह तोमर' या सिनेमाचे लेखक संजय चौहान यांचे निधन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'पान सिंह तोमर'च्या लेखकाचे 'या' आजारामुळे निधन
  • सिनेमा लेखक म्हणून होते प्रसिद्ध
  • पत्रकारितेच्या क्षेत्रातून सुरुवात करत पुढे मनोरंजनसृष्टीत आले

Paan Singh Tomar Writer Sanjay Chouhan Dies At The Age Of 62 After Suffering From Chronic Liver Disease : मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. 'पान सिंह तोमर' या सिनेमाचे लेखक संजय चौहान यांचे निधन झाले. ते 62 वर्षांचे होते आणि लीव्हरशी संबंधित समस्येमुळे आजारी होते. मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (शुक्रवार 13 जानेवारी 2023) दुपारी 12.30 वाजता मुंबईत ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

सिनेमा लेखक म्हणून संजय चौहान प्रसिद्ध होते. त्यांनी 'पान सिंह तोमर', 'साहेब बीवी गँगस्टर', 'आय एम कलाम', 'मैंने गांधी को नहीं मारा', 'धूप' या सिनेमांचे लेखन केले होते. 'आय एम कलाम'साठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. लेखकांच्या अधिकारांसाठी ते आग्रही होते. 

कोण होते संजय चौहान?

संजय चौहान यांचा जन्म मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये झाला होता. त्यांचे वडील रेल्वे विभागात होते तर आई शिक्षिका होती. पत्रकारितेच्या क्षेत्रातून सुरुवात करत संजय चौहान पुढे मनोरंजनसृष्टीत आले. त्यांनी 1990च्या दशकात सोनी टीव्हीसाठी क्राइम बेस्ड सीरीज 'भंवर' लिहिली होती. संजय चौहान यांच्या पश्चात पत्नी सरिता आणि मुलगी सारा आहेत. 

सुशांतसिंगचा झाला होता खून? पोस्टमॉर्टम करणाऱ्याचा धक्कादायक खुलासा

सलमान भाईचा बर्थडे पडला महागात; पोलिसांनी चाहत्यांना दिला लाठीचा प्रसाद

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी