Pallavi Joshi injured : अभिनेत्री पल्लवी जोशी अपघातात जखमी

Pallavi Joshi injured; vehicle on sets of The Vaccine War lost control and hit the actress : प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी सिनेमाच्या सेटवर झालेल्या अपघातात जखमी झाली.

Pallavi Joshi injured
अभिनेत्री पल्लवी जोशी अपघातात जखमी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री पल्लवी जोशी अपघातात जखमी
  • प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी ही निर्माते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी
  • 'काश्मीर फाईल्स'सह अनेक सिनेमांमध्ये तसेच टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी

Pallavi Joshi injured; vehicle on sets of The Vaccine War lost control and hit the actress : प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी सिनेमाच्या सेटवर झालेल्या अपघातात जखमी झाली. 'काश्मीर फाईल्स'सह अनेक सिनेमांमध्ये तसेच टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी ही निर्माते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आहे.

सध्या पल्लवी जोशी पती विवेक अग्निहोत्री यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. हैदराबाद येथे 'द व्हॅक्सिन वॉर'चे शूटिंग सुरू असताना अपघात झाला. सेटवरील एक वाहन चालकाने नियंत्रण गमावल्यामुळे पल्लवी जोशी यांना धडकले. या अपघातात पल्लवी जोशी जखमी झाल्या. पण काळजी घेत स्वतःचा सीन पूर्ण करून नंतर पल्लवी जोशी उपचारासाठी रवाना झाल्या.

'द व्हॅक्सिन वॉर' सिनेमात पल्लवी जोशींसह नाना पाटेकर, अनुपम खेर असे ताकदीचे कलाकार आहेत. सिनेमाचे शूटिंग सुरू असताना झालेल्या अपघातात पल्लवी जोशी जखमी झाल्या आहेत. पण त्यांच्या जखमांचे स्वरुप गंभीर नसल्याचे वृत्त आहे. वेळेत उपचार मिळाल्यामुळे पल्लवी जोशी यांची प्रकृती स्थिर आहे. 

Bigg Boss Marathi season 4 Winner : बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता

सुशांतसिंगचा झाला होता खून? पोस्टमॉर्टम करणाऱ्याचा धक्कादायक खुलासा

कोण आहेत पल्लवी जोशी?

पल्लवी जोशी यांनी बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी टीव्ही मालिका तसेच सिनेमांमध्ये काम केले. इन्साफ की आवाज, अंधा युद्ध, दाता, सौदागर, तलाश, इन्सानियत, इम्तिहान या सिनेमांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिकांचे कौतुक झाले.  द कश्मीर फाईल्स या सिनेमात भूमिका साकारतानाच त्यांनी निर्मितीची जबाबदारी पण सांभाळली. 

'अल्पविराम' या मालिकेत बलात्कार पीडित मुलीच्या व्यक्तिरेखेसाठी पल्लवी जोशी यांना सहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. तसेच पल्लवी जोशी यांनी अनेक वर्ष 'सारेगमप' या सुप्रसिद्ध मराठी रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले होते. असंभव, अनुबंध यासारख्या मालिकांची त्यांनी निर्मिती केली. झी मराठीवर ग्रहण या टीव्ही मालिकेत त्यांचं दर्शन घडलं.

पल्लवी जोशी यांनी १९९७ मध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. द व्हॅक्सिन वॉर हा त्यांचा सिनेमा २०२३ च्या उत्तरार्धात मोठ्या पडद्यावर येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी