[VIDEO] सेक्रेड गेम्स २ साठी आता उरले अवघे काही तास, पण त्याआधी 'गुरुजी'चा हा नवा व्हिडिओ पाहाच!

बी टाऊन
Updated Aug 14, 2019 | 18:28 IST

Sacred Games Season 2: सेक्रेड गेम्स २ सीझनसाठी काही तासच उरले आहेत. त्याआधीच आता पंकज त्रिपाठीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

-Sacred-Games-Season-2_youtube
सेक्रेड गेम्स २ साठी आता उरले अवघे काही तास, पण...  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • पाहा सेक्रेड गेम्स २ मधील गुरुजीची पहिला झलक
  • गणेश गायतोंडेसोबतच गुरुजीचीही भूमिका असणार महत्त्वाची
  • प्रेक्षकांना पंकज त्रिपाठीकडून आहेत भरपूर आशा

मुंबई: नेटफ्लिक्सवरील वेब सीरीज सेक्रेड गेम्सचा दुसरा सीजन रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. त्याच आधी हा वेब सीरीजमधील सर्वात चर्चेत असलेल्या 'गुरुजी' म्हणजेच अभिनेता पंकज त्रिपाठीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. सेक्रेड गेम्स २ मध्ये गणेश गायतोंडे आणि सरताज सिंह यांच्याशिवाय गुरुजीची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. सेक्रेड गेम्स २चा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये गुरुजीची पहिली झलक पाहायला मिळते आहे. 

या प्रोमोमध्ये गुरुजीची भूमिका साकारणारा पंकज त्रिपाठी म्हणतो, 'शोक आणि दु:ख याने माणसाला प्रत्येक दिशेने घेरलं आहे. सुखापासून कोसो दूर दु:खाच्या विळख्यात हिंदुस्थानसह संपूर्ण जग अडकलं आहे. या दुनियेला वाचवावं लागेल. काय हे जग वाचवण्याच्या लायकीचं आहे?' 

प्रोमोच्या शेवटी पंकज त्रिपाठी असं म्हणतो की, 'जे काम देव करु शकला नाही ते काम आता माणूस करेल. यानंतर तो आपला सिग्नेचर डायलॉग अहम ब्रह्मास्मी असं तीनदा बोलताना दिसतो. सेक्रेड गेम्स २ मध्ये पंकज त्रिपाठीचा लूक फारच वेगळा दिसतो आहे. 

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनमध्ये गुरुजी म्हणजेच पंकज त्रिपाठीची फारच छोटी भूमिका होती. पहिल्या सीजनच्या शेवटी समोर येतं की, गुरुजी हाच गणेश गायतोंडेचा तिसरा बाप आहे. तसंच २५ दिवसानंतर होणाऱ्या हल्ल्याचा मास्टरमाइंड देखील तोच आहे. 

पंकज त्रिपाठीने या सीजनची शूटिंग ही परदेशात केली आङे. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनमध्ये अनेक गुपित उलगडणार आहेत. या सीजनमध्ये पंकज त्रिपाठीची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. तसंच त्याला मुंबईवर नेमका हल्ला का करायचा असतो हे देखील स्पष्ट होणार आहे.

सीजन २ चे सह-दिग्दर्शक नीरज घायवान यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, या सीजनमध्ये अनेक नवी पात्रं आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिवूड अभिनेत्री कल्कि ही केकला बात्या एबेलमॅन हे पात्र रंगवताना दिसणार आहे. ती एक पॅलेस्टाईन महिला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. जी गुरुजीची शिष्या देखील असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

दुसऱ्या सीजनमध्ये रॉ एजंट के. डी यादव देखील असणार आहे. जो केनियामध्ये राहत असतो. या सीजनमध्ये आपल्याला अमृता सुभाष देखील पाहायला मिळणार आहे. तसंच या सीजनमध्ये पंकज त्रिपाठी म्हणजेच गुरुजीची भूमिका ही फार मोठी असणार आहे. याशिवाय रणवीर शौरी हा साजिद खानच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सेक्रेड गेम्सचा दुसरा सीजन कधी येणार याची चाहत्यांना बरीच उत्सुकता लागून राहिली होती. पहिल्या सीजनमधील गुपित दुसऱ्या सीजनमध्ये उलगडणार का? याकडेच आता चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसंच नवाजुद्दीनसह पंकज त्रिपाठीच्या भूमिकेकडे देखील चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे. आता ही सगळी गुपितं फक्त पुढील काही तासातच उलगडणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...