Saaho: बाहुबली प्रभासचा 'साहो' १५ ऑगस्टला होणार प्रदर्शित, अक्षय, जॉनला देणार टक्कर

बी टाऊन
Updated May 21, 2019 | 17:05 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Saaho Poster: बाहुबली 'प्रभास' लवकरच एक नवीन सिनेमा घेऊन बॉलिवूडमध्ये एंट्री घेत आहे. साहो १५ ऑगस्ट २०१९ ला चित्रपटगृहात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Prabhas Saaho poster
साहो पोस्टर   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः बाहुबली सिनेमातून देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झालेला प्रभास बॉलिवूडमध्ये कधी एंट्री घेणार हा सगळ्यांना पडलेला प्रश्न होता. पण आता ही प्रतिक्षा संपली आहे. प्रभास 'साहो' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. चित्रपटाची पहिली झलक याआधीच समोर आली होती. आता चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच घोषित करण्यात आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर प्रसिद्ध केलं असून यात प्रभास डॅशिंग लूकमध्ये दिसत आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. 

प्रभाससोबत 'आशिकी' गर्ल श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. साहो चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन्स आपल्याला पहायला मिळतील. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या व्यतिरिक्त नील नितिन मुकेश, जॅकी श्राफ, मंदिरा बेदी, अरूण विजय, संपत राज सारखे कलाकार या चित्रपटात प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन सजीत यांनी केले असून हा सिनेमा तामिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेत रिलीज होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. १५ ऑगस्ट २०१९ ला 'साहो' चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार आहे. प्रभासच्या 'साहो'ला अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चा सामना करावा लागणार आहे.

 

 

मिडीया रिपोर्ट्सनुमार, साहो एक स्पाय थ्रिलर फ्लिल्म असून या चित्रपटच्या निर्मितीसाठी ३०० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे. या चित्रपटातील एक दृष्य अबू धाबी मध्ये चित्रीत करण्यात आले असून शूटिंग दरम्यान प्रभास बाईक चालवताना दिसेल. चित्रीकरणासाठी ९० कोटी रूपये खर्च आला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर निर्मात्यांनी इंटरव्हल सिक्वेंस शूट करण्यासाठी ३० कोटी रूपये खर्च झाले आहेत. साहो एक उत्कृष्ट सिनेमा असेल यात कुठलीच शंका नाही. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

मागील वर्षी १५ ऑगस्टलाच अक्षय कुमारचा 'गोल्ड' आणि जॉन इब्राहमचा 'सत्यमेव जयते' या चित्रपटांमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. या स्वातंत्रदिनीही पुन्हा एकदा जॉन इब्राहम आणि अक्षय कुमार मध्ये स्पर्धा होणार होतीचं पण 'साहो' याच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असल्यानं आता अक्षय आणि जॉन याचा मार्ग सोपा असणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी