परिणीती चोप्राने केले टॉपलेस फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो

बी टाऊन
Updated Apr 01, 2021 | 14:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

परिणीती चोप्राचा सध्याचा एक टॉपलेस फोटो बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेत आहे. सायना स्टारचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

parineeti
परिणीती चोप्राने केले टॉपलेस फोटोशूट, व्हायरल झाला फोटो 

थोडं पण कामाचं

  • परिणिती चोप्रा या फोटोमध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे
  • डब्बू रतनानीने परिणीती चोप्राचा हा फोटो स्वत: शेअर केला आहे.
  • परिणीती चोप्राने लेडीज व्हर्सेस रिकी बहल या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी नुकताच अभिनेत्री परिणीती चोप्राचा टॉपलेस फोटो शेअर केला. दरम्यान, त्यांनी हे सांगितले नाही की हे फोटोशूट या वर्षीच्या कॅलेंडरचे आहे की नाही. मात्र सायना स्टारचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

फोटोमध्ये परिणीती चोप्रा एका पिवळ्या रंगाच्या गाडीत बसली आहे आणि ती टॉपलेस दिसत आहे. दरवर्षी डब्बू रतनानी आपल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी डब्बू रतनानीने कियारा अडवाणीचे टॉपलेस फोटोशूट केले होते. यावेळी परिणीती चोप्राचा फोटो व्हायरल होत आहे.

परिणीती चोप्राने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. छोट्याशा स्माईलसह ती कॅमेऱ्याच्या दिशेने पोझ देताना दिसत आहे. डब्बू रतनानीने परिणीती चोप्राचा हा फोटो स्वत: शेअर केला आहे. त्याने लिहिले की, आपली गाडी एका जागी थांबव. 

परिणिती चोप्रा या फोटोमध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे. दरम्यान, गेल्या २०२०मध्येही परिणीती चोप्रा, डब्बू रतनानीच्या वार्षिक कॅलेंडरचा भाग होती. मात्र त्यावेळेस कियारा अडवाणी लाईमलाईटमध्ये राहिली होती. याशिवाय शाहरूख खान, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, अक्षय कुमार आणि विकी कौशल याचा भाग होते. 

परिणीती चोप्राचे एकामागोमाग एक सिनेमे रिलीज होत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिचा द गर्ल ऑन द ट्रेन रिलीज झाला. यानंतर थिएटरमध्ये संदीप और पिंकी फरार आणि आता सायना हा सिनेमा रिलीज झाला आहे. परिणीती चोप्राने लेडीज व्हर्सेस रिकी बहल या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर परिणीतीने अनेक सिनेमे केले. यात गोलमाल अगेन, हंसी तो फसी, किल दिल आणि इश्कजादे या सिनेमांचा समावेश आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी