Pathaan Box Office Collection Day 19: पठाण चित्रपट कमाईत 'बाहुबली 2' ला चितपट करणार; बनवणार नवा रिकॉर्ड

बी टाऊन
Updated Feb 13, 2023 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

शाहरुख  खान ने नुकतीच त्याचा येणारा चित्रपट पठाणची शूटिंग सुरी केली आहे. पण चाहत्यांचमध्ये चित्रपटाला घेऊन क्रेज काय कमी होताना दिसत नाही आहे. चित्रपटगृहात चित्रपट रिलीज होऊन १५ दिवसांपेक्षा जास्त झाले असतील.

Pathaan Box Office Collection Day 19: 'Pathan' is ready to break the record of 'Baahubali 2'!
'बाहुबली 2' ला पठाण चितपट करणार; कमाईत बनवणार नवा रिकॉर्ड   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जिथे वर्ल्ड वाइड पठाण ने 900 कोटींपोक्षा जास्तची कमाई केली आहे
  • वीकेंडला पठाणची जादू चालली आहे.
  • वर्ल्ड वाइड चित्रपटचा आकडा 1000 कोटींच्या दिशेकडे जात आहे.

Pathaan Box Office Collection Day 19: नवी दिल्ली : बॉक्स ऑफिसवर पठाण नवीन रिकॉर्ड बनवत असतानाच अभिनेता शाहरुख खान दुसरा चित्रपटाच्या शुटिंगमध्ये लागला आहे.यामुळे चाहत्यांना शाहरुख खानच्या दुसऱ्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान चाहत्यांमध्ये पठाण चित्रपटाची चित्रपटाची क्रेझ अजून कायम आहे. चित्रपटगृहात चित्रपट रिलीज होऊन 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस  झाले असतील. पण तरीही चित्रपट दमदार कमाई करताना दिसत आहे. पठाण या चित्रपटाने वर्ल्डवाइड 900 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे तर तिथेच भारतात हा चित्रपट 500 कोटी रुपयांचा टप्पा पार करणार आहे, चित्रपटाच्या एकूण बजेटपेक्षा पठाणने  कितीतरी पटीने कमाई केली आहे.  

अधिक वाचा  : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा संदेश

या वीकेंडला पठाणची जादू चालली आहे. बातम्यानुसार चित्रपटाने 19व्या दिवशी हिंदी वर्जनमध्ये 12.50 कोटींची कमाई केली आहे. तर एकूण कमाईचा विचार करता पठाणने भारतात हिंदी भाषेत एकूण 486.25 कोटी कमावले आहेत. ओव्हर ऑल बॉक्स ऑफिसवर कमाईचा आकडा 582 कोटींहून अधिक झाला आहे. 

वर्ल्डवाईड या चित्रपटाचा आकडा 1000 कोटींच्या दिशेकडे जात आहे. वास्तविक ग्लोबल बॉक्स ऑफिसवर पठाण या चित्रपटाने  950 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. दुसरीकडे, चित्रपटाच्या कमाईचा वेग असाच राहिला तर पठाण बाहुबलीचा 1000 कोटींचा रिकॉर्ड मोडेल.

अधिक वाचा  : Gajanan maharaj quotes : वाचा श्री गजानन महाराज यांचे कोट्स

शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि  जॉन अब्राहम स्टारर पठाणने 18व्या दिवशी एकूण 10.75 कोटी रूपये कमवले. मात्र, एंकदरीत भारतातील ग्रॉस कलेक्शन 572 कोटी रूपये झाले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात 924 कोटींची कमाई केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी