Pathan Box Office Day 1 : Shah Rukh Khan film likely to beat KGF 2 and War record with Rs 54 crore collection : शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण या हिंदी सिनेमाने पहिल्या दिवशी 54 कोटी रुपयांची कमाई केली. एवढे प्रचंड बॉक्स ऑफिस कलेक्शन करून पठाण सिनेमाने केजीएफ 2 आणि वॉर या दोन सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन रेकॉर्डवर मात केली.
Pathaan Movie Review Marathi : चाहत्यांना कसा वाटला पठाण सिनेमा वाचा काय आहे रिव्ह्यू
शाहरूखने 4 वर्षांच्या गॅपनंतर पठाण सिनेमाच्या निमित्ताने बिग स्क्रीनवर पुनरागमन केले आहे. पुनरागमन करून शाहरूखने पहिल्याच सिनेमाच्या माध्यमातून विक्रमी कमाईच्या दिशेने वाटचाल केल्याचे वृत्त आहे.
पठाण हा हिंदी सिनेमा बुधवार 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झाला. आज गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाची सुटी आहे. तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवशीही सिनेमा बघण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे सिनेमा पहिल्याच आठवड्यात 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
पठाण सिनेमातील प्रमुख कलाकार : शाहरूख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा
पठाण सिनेमाचे निर्माता दिग्दर्शक : पठाण सिनेमा हा YRF च्या स्पाय युनिव्हर्सची निर्मिती आहे. हा सिनेमा सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे.