Pathan box office Total collection in Marathi : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या पठाण सिनेमाची रिलीज होण्यापूर्वी बरीच चर्चा झाली. इतकेच नाही तर हा सिनेमा बॉयकॉट करण्याचा ट्रेंडही पहायला मिळाला. मात्र, अखेर 25 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा रिलीज झाला. पठाण या सिनेमाच्या निमित्ताने चार वर्षांच्या गॅपनंतर शाहरूख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकताना दिसत आहे. पठाण सिनेमाचे शो हाऊसफुल होत आहेत. (Pathaan movie box office collection likely to collect rs 300 crore in 1st weekend predict film business expert girish johar)
पठाण सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमाने 'ओपनिंग डे'ला जवळपास 52 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पठाण सिनेमा हा नॉन हॉलिडेच्या दिवशी रिलीज झालेला असतानाही इतकी मोठी कमाई केली आहे. त्यातच आता लोकप्रिय निर्माता आणि सिने व्यवसाय तज्ज्ञ गिरीश जोहर यांनी एक मोठा अंदाज वर्तवला आहे. झूम टीव्ही डिजिटलसोबत बोलताना गिरीश जोहर यांनी सांगितले की, शाहरूख खानचा 'पठाण' सिनेमा पहिल्या वीकेंडमध्ये 300 कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकतो.
हे पण वाचा : कमळाचं फूल तुमच्या चेहऱ्यावर देईल स्पेशल ग्लो
गिरीश जोहर यांनी सांगितले की, सिनेमाला सकाळी आणि दुपारच्या शोज ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मला असे वाटते की, सकाळच्या तुलनेत संध्याकाळी आणि रात्री उशीराच्या शोजला प्रेक्षकांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळेल. शाहरूख खानचा पठाण सिनेमा ओपनिंग वीकेंडला जगभरात 300 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : थंडीत खा आवळा अन् आजार पळवा
गिरीश जोहर यांनी पुढे म्हटलं की, 26 जानेवारीच्या दिवशी हा सिनेमा मोठा गल्ला जमवेल. या दिवशी सुट्टी असल्याने प्रेक्षकांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळताना दिसण्याची शक्यता आहे. येत्या पाच दिवसात हा सिनेमा जगभरात 300 कोटी रुपयांपर्यंत कमाई करेल अशी अपेक्षा आहे. पठाण सिनेमा आपल्या पहिल्या वीकेंडला भारतात 200 कोटी रुपयांपर्यंत कमाई करु शकतो.