Pathaan Teaser out Now: Shah Rukh Khanने चाहत्यांसाठी दिले बर्थडे गिफ्ट...पाहून अंगावर येतील शहारे...

बी टाऊन
Updated Nov 02, 2022 | 12:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pathaan Teaser out Now:शाहरूख खान खरच किंग खान आहे. त्याने आज आपल्या बर्थडेनिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. शाहरूख खानने आपल्या बर्थडेनिमित्त आपल्या बहुप्रतिक्षित पठाण सामन्याचा टीझर रिलीज केला आहे. 

shah rukh khan
Pathaan Teaser : Shah Rukh Khanने चाहत्यांसाठी बर्थडे गिफ्ट 
थोडं पण कामाचं
  • शाहरूख खानचा बहुप्रतिक्षित सामना पठाणची चाहते अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होते.
  • आपल्या वाढदिवसानिमित्त किंग खानने चाहत्यांना पठाणची झलक देत मोठी ट्रीट दिली आहे.
  • आज 2 नोव्हेंबर शाहरूख खानचा 57वा वाढदिवस आहे.

मुंबई: तुम्हाला पठाणबद्दल(pathan) काय माहीत आहे? नक्कीच तुम्ही आतापर्यंत पठाणबद्दल काही जाणत नसाल मात्र आता तुम्हाला पठाणबद्दल समजेल. कारण शाहरूख खानने(shah rukh khan) पठाणची झलक त्याच्या चाहत्यांना दाखवली आहे. शाहरूखच्या बहुप्रतिक्षित पठाण सिनेमाचा टीझर(pathaan movie release) रिलीज झाला आहे. 

अधिक वाचा - चमकदार त्वचेसाठी देशी तुपाचा वापर

शाहरूखची चाहत्यांना ट्रीट

शाहरूख खानचा बहुप्रतिक्षित सामना पठाणची चाहते अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र आपल्या वाढदिवसानिमित्त किंग खानने चाहत्यांना पठाणची झलक देत मोठी ट्रीट दिली आहे. आज 2 नोव्हेंबर शाहरूख खानचा 57वा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त पठाणचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझर इतका दमदार आहे की तुमच्या अंगावर शहारे येतील. 

सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार एक गोष्ट नेहमीप्रमाणे राहणार की आपल्या वाढदिवसानिमित्त शाहरूख आपल्या चाहत्यांना भेटून त्यांच्या शुभेच्छा घेणार. शाहरूख ताज हॉटेलमध्ये चाहते आणि मीडियाची भेट घेणार तसेच तेथे केकही कापणार आहे. शाहरूख आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानणार ज्यांनी त्याला कठीण काळात साथ दिली. 

अधिक वाचा - कोहली रचणार इतिहास, बांगलादेशविरुद्ध करणार हा महारेकॉर्ड!

मन्नतच्या बाहेर शाहरूखच्या चाहत्यांची गर्दी

शाहरूख खान आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. शाहरूखच्या बर्थडेनिमित्त दरवर्षी मन्नत या त्याच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी असते. यावेळेसही असेच काहीसे दृश्य पाहायला मिळू शकते. शाहरूखच्या बर्थडेनिमित्त चाहते अर्ध्या रात्रीपासून बाहेर एकत्र झाले आहेत. शाहरूखने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. त्याने आपल्या बाल्कनीमधून बाहेर येत चाहत्यांचे प्रेम आणि त्यांच्या सपोर्टसाठी धन्यवाद मानले. 

शाहरूख दिवसाला कमावतो इतके कोटी

बिझनेस एपेकच्या रिपोर्टनुसार शाहरूख बॉलिवूडचा प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. किंग खानची एका दिवसाची कमाई तब्बल 1.4 कोटी रूपये आहे. शाहरूख खानची एकूण नेटवर्थ 5 हजार 593 कोटी रूपये आहे. शाहरूखची स्वत:ची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आहे याच्या बॅनरखाली अनेक सिनेमे बनवले जातात. आणि या सिनेमाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची कमाई होते. तसेच क्रिकेटमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा को ऑनर आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट ही दोन क्षेत्रे आपल्या देशात अतिशय लोकप्रिय आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी तो किंग खान आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी