Pathan Movie Song ,Besharam Rang Copyright: शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या पठाण (Pathan) चित्रपटाची (film) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दीपिका पदुकोणच्या हॉट डान्समुळे प्रेक्षकांनी हे गाणं (Song) डोक्यावर घेतलं आहे. मात्र आता जी गोष्ट समोर येते आहे, त्यावरुन पठाण चित्रपटाचे संगीतकार संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. या गाण्याचा काही भाग कॉपी केल्याचा आरोप संगीतकारांवर होत आहे. यामुळे बिकिनीच्या रंगावरुन वादात सापडलेला 'पठाण' आता गाण्यामुळे संकटात आला येतो की काय अशी शक्यता वाटू लागली आहे. (Pathan : Besharam Rang song Copyright issue)
बेशर्म रंग या गाण्याने सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घातला आहे. गाण्याचे बोल असो किंवा शाहरुख खान आणि दीपिकाचे हॉट डान्समुळे चर्चेत आला होतं. हे गाणे चोरी करण्यात आल्याचा आरोप होत असल्याने या गाण्याची परत एकदा चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान हे गाणे संपूर्णपणे चोरी केलेले नसून यातील काही भाग हा चोरीचा असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूडमध्ये गाण्याची चोरी करण्याचा आरोप पहिल्यांदा होतोय असं नाही. याआधी सुद्धा अनेक लोकप्रिय गाण्यांवर चोरीचा आरोप करण्यात आला होता. अशा काही गाण्यांबद्दल आपण जाणून घेऊया..
अजय देवगनच्या 'दिलजले' या चित्रपटातील मेरा मुल्क मेरा देश हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. त्यावेळी हे गाणं प्रत्येकांच्या ओठांवर होतं.या चित्रपटातील गाण्याचे संगीतकार अनु मलिक होते. आश्चर्याची गोष्ट ही की,या गाण्याची धून इस्राईल राष्ट्रगानाशी मिळती जुळती आहे. त्यामुळे या गाण्यावर चोरीचा आरोप झाला होता.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह याच्यावरही गाणे चोरी करण्याचा आरोप झाला आहे. गेंदा फूल हे सुपरहिट गाणे त्याने चोरी केले होते, असा आरोप करण्यात आला होता. जॅकलीन फर्नांडीसने काम केले आहे. हे गाणं बंगालीतील बेरोलोकी बिटिलो इथून कॉपी करण्यात आल्याची चर्चा होती. होणाऱ्या या आरोपांवर बादशाहाने गप्प राहण्यात शहाणपणा मानला होता.
अनु मलिक, बादशाह यांच्यावरच नाही तर दिग्गज संगीतकार प्रीतमवर सुद्धा गाणे कॉपी करण्याचा आरोप झाला होता. जेव्हा सुपरहिट फिल्म 'गॅगस्टर'चं या चित्रपटातील 'तू ही मेरी शब है सुबह है' हे गाणं रिलीज झालेलं तेव्हा ते ओलिवर शांति एंड फ्रेंड्समधील सेक्रल निर्वाणाच्या गाण्याची कॉपी करण्यात आल्या आरोप झाला होता. गाणे ओरिजनल असो किंवा चोरीचे तरीही हे गाणं प्रेकक्षकांच्या पसंतीला उतरले होते.
2017 साली सलीम-सुलेमानच्या हारेया या गाण्यावर पाकिस्तानी अभिनेता फरहान सईद यांनी चोरीचा आरोप केला होता. सलीम-सुलेमानने हा आरोप धूडकावून लावला होता.