Pathan Box Office Collection Day 5 in Marathi: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट (movie) पठाणची (Pathan) जादू बॉक्स ऑफिसवर (Box Office) कायम आहे. 25 जानेवरी रोजी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नव नवीन रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासून पठाण वादात सापडला होता. बॉयकॉटच्या संकटामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरेल किंवा त्याच्या कमाईवर मोठा परिणाम होईल अशी शक्यता वतर्वली जात होती. परंतु शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉलिवूडवरील (Bollywood) सुपरहिट चित्रपटाचा दुष्काळ दूर केला. कमाईच्या बाबतीत पठाणने नवे विक्रम बनवत सलग पाचव्या दिवशी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. पठाण या चित्रपटाने पाचव्या दिवशी कमाईचा 500 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. (Pathan Box Office Collection Day 5: Pathan creates history, crosses 5 crore in 5 days)
अधिक वाचा :असं करा महात्मा गांधींजी यांच्या पुण्यतिथीचं भाषण
चित्रपटाला YRF प्रोडक्शनने बनवले आहे, स्पाय युनिव्हर्सच्या या चित्रपटातील ट्विस्ट आणि टर्न चाहत्यांना खूप आवडतात.त्याचीच प्रचिती कमाईच्या रुपाने दिसत आहे. पठाणमध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) त्याचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटातील सलमान खानच्या कॅमिओचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यात चित्रपटाची कमाई पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर बॉयकॉट गँगची बोलती बंद झाली आहे.
अधिक वाचा : इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत भारताने जिंकला विश्वचषक
पठाण चित्रपटाचे पाचव्या दिवसाचे म्हणजे रविवारीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झाले याचे आकडे समोर आले आहेत. या सगळ्यामध्ये अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, पठाणचे 5व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 60-62 कोटींचे असणार आहे. त्यामुळे पठाण चित्रपटाने 5 दिवसांत 500 कोटींचा आकडा पार केल्याचं सांगितलं जात आहे. यासह चित्रपटाने एक मोठा विक्रम केला आहे. याआधी कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला चाहत्यांचे इतके प्रेम मिळालेले नाही.
पठाणच्या यशानंतर शाहरुख खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा किंग ठरला. या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारपर्यंत जगभरात 429 कोटींचा व्यवसाय केला. तर 5 व्या दिवशी हा आकडा 500 कोटींच्या पुढे गेला आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये पठाणचे शो हाऊसपूल होत आहेत. या चित्रपटाला लाँग वीकेंडचाही जबरदस्त फायदा झाला आहे.