Pathan Movie advance booking: मुंबई : शाहरुख खानचा चित्रपट (movie) पठाणवर बॉयकॉटचं संकट असतानाही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर (box office) खूप चर्चा होत आहे. प्रेक्षकांमध्येही (audience) या चित्रपटाविषयी क्रेझ असल्याच अॅडव्हान्स तिकीटांची बंपर विक्रीतून दिसत आहे. साधरण चार वर्षानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan)) पडद्यावर पदार्पण करत असून त्याच्या या पठाण चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित केलं आहे. पठाण (Pathan)चित्रपटाचे 4 लाख 19 हजार रुपयांचे अॅडव्हास तिकीटांची विक्री झाली आहे. (Pathan Movie advance booking: 4.30 lakh tickets sold in advance )
अधिक वाचा : KLराहुल-अथिया शेट्टीने खंडाळ्यात घेतले सातफेरे
सोमवारी रात्री पठाण चित्रपटाच्या 4 लाख 19 हजार तिकीटांची विक्री झाली. पहिल्या दिवशी 1.71 लाख तिकीटांची विक्री झाली आहे. 24 जानेवारी सकाळी हा तिकीट विक्रीचा आकडा साडेचार लाखावर पोहोचला आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पठाण हा चित्रपट सर्वात हिट हिंदी चित्रपट झाला आहे.
अधिक वाचा : डान्सर गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ
याआधी याप्रकारची अॅडव्हास ओपनिंग दक्षिणात्य चित्रपट बाहुबली-2 ला मिळाली होती. या चित्रपटाची अॅडव्हास बुकिंग सहा लाख तिकीटांची झाली होती. दरम्यान पठाण चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आलेले केजीएफ 2, बाहुबली 2 च्या मागे आहे. केजीएफ2 च्या पहिल्या दोन शोसाठी 5 लाख 15 हजारचे अॅडव्हास तिकीट विकले गेले होते. तर बाहुबली 2 या चित्रपटाचे पहिल्या दोन शोसाठी साडेसहा लाख तिकीटांची अगाऊ बुकिंग झाली होती.
पठाणसाठी प्रेक्षकांची क्रेझ विशेष मानली जाते कारण बाहुबली 2 आणि KGF 2 हे दोन्ही सिक्वेल चित्रपट होते आणि KGF 2 आंबेडकर जयंतीच्या सुट्टीवर प्रदर्शित झाले होते. तर पठाण हा चित्रपट कोणत्याच चित्रपटाचा सीक्वेल नाही नाही कोणत्या सुट्टीवर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. तसेच हा चित्रपट कोणत्याच चित्रपटाचा रिमेक नाहीये. यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी क्रेझ आहे.
अधिक वाचा :फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी रश्मी वहिनींकडे पाठवला निरोप
गेल्या काही दिवसात हिंदी चित्रपटांना कमाईच्या बाबतीत सडकून मार खावा लागला होता. अशात पठाण या चित्रपटाला इतकी मोठी अॅडव्हास बुकिंग मिळाल्याने हा सिनेमा हिंदीमधील हिट चित्रपट ठरला आहे. विक्रमी अॅडव्हास बुकिंगचा रेकॉर्ड हा आधी हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा चित्रपट वॉरच्या नावावर होता. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशी 4 लाख 10 हजार अॅडव्हास बुकिंग झाली होती.
मुंबईतील शाहरुखच्या एका चाहत्याने 25 जानेवारीला होणाऱ्या पहिल्या शोसाठी संपूर्ण थिएटर बुक केले आहे. त्याची तिकिटे अॅसिड पीडित मुली आणि शाहरुखच्या चाहत्यांना वाटली जातील. ट्रेड अॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात बंद झालेली अशी 25 सिंगल स्क्रीन थिएटर्स पठाणच्या रिलीजसोबतच पुन्हा सुरू होत आहेत.
हा चित्रपट हिट होणार की फ्लॉप, हे येत्या चार-पाच दिवसांत स्पष्ट होईल, पण ज्या पद्धतीने पठाणचे अॅडव्हान्स बुकींग झाले आहे,त्यावरून बऱ्याच काळानंतर बॉलिवूडच्या चित्रपटाला अशी बंपर ओपनिंग मिळाली आहे. व्यापार विश्लेषकांचा अंदाज आहे की, पठाणची पहिल्या दिवसाची कमाई सुमारे 45 कोटी असू शकते. पहिल्या 2-3 दिवसांतच हा चित्रपट 100 कोटींचा आकडा गाठेल.
पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. हा हिंदी पट्ट्यातील सुमारे 4500 स्क्रीन्सवर रिलीज होईल, तर तमिळ आणि तेलुगू स्क्रीनसह सुमारे 5000 स्क्रीन्सवरही हा सिनेमा रिलीज होणार आहे.