Movies this week: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘या’ बॉलिवूड चित्रपटांचा असेल नजराणा

बी टाऊन
Updated Dec 02, 2019 | 15:51 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Bollywood and Hollywood Films This Week: डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या जवळपास ३२५ कोटी रूपयांचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची सुरूवात चित्रपट पती, पत्नी और वो, पानीपतनं होणार आहे.

Pati Patni Aur Woh, Panipat
डिसेंबरमध्ये बॉलिवूडचे तब्बल ३२५ कोटींचे चित्रपट होणार रिलीज 

मुंबई: बॉलिवूड वर्षाच्या अखेरच्या महिन्यात प्रेक्षकांसाठी जबरदस्त मेजवानी घेऊन आलंय. डिसेंबर महिन्यात अनेक दमदार चित्रपट रिलीज होणार आहेत. याची सुरूवात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पती, पत्नी और वो आणि पानीपत या चित्रपटापासून होतेय.

अभिनेता कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा ‘पती, पत्नी और वो’ हा चित्रपट ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट ७०च्या दशकात आलेल्या याच नावाच्या चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपट एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअरवर आधारित आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरच्या एका डायलॉगवरून खूप वाद निर्माण झाला होता. नंतर हा डायलॉग चित्रपटातून हटविण्यात आला.

‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाचा सामना आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक चित्रपट पानीपत सोबत होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कृती सेनन, अभिनेता अर्जुन कपूर आणि संजय दत्त प्रमुख भूमिकांमध्ये आहे. हा चित्रपट ‘पानीपत’च्या तिसऱ्या युद्धावर आधारित आहे. हे युद्ध मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालं होतं.

 

 

 

 

हॉलिवूड आणि पंजाबीमध्ये रिलीज होतील हे चित्रपट

बॉलिवूडसोबतच या आठवड्यात काही हॉलिवूड आणि पंजाही चित्रपट रिलीज होणार आहेत. या लहान मुलांसाठीचा एनिमेटेड चित्रपट Playmobil: The Movie याचाही समावेश आहे. हा चित्रपट फ्रोजन सारखे चित्रपट देणारे करणारे दिग्दर्शक लिनो डिसालवो यांनी दिग्दर्शित केलाय.

 

 

पंजाबी चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर ६ डिसेंबरला ‘तू मेरा की लगदा’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात हरजीत हरमन, शेफाली शर्मा आणि युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटात रविंदर ग्रेवाल आणि जरपिंदर चीमा यांचीही पाहुणे कलाकाराची भूमिका आहे.

डिसेंबरमध्ये तब्बल ३२५ कोटींचे चित्रपट

डिसेंबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडनं जवळपास ३२५ कोटी रुपयांचा डाव लावलाय. या महिन्यात खूप मोठ-मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. या सर्व चित्रपटांची किंमत ३२५ कोटींच्या घरात आहे. डिसेंबरमध्ये पती,पत्नी और वो, पानीपत सोबतच सलमान खानचा दबंग-३ आणि अक्षय कुमारचा गुड न्यूज हा चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे.

 

 

 

 

याशिवाय रानी मुखर्जीचा गाजलेला चित्रपट मर्दानीचा सिक्वेल मर्दानी-२ सुद्धा १३ डिसेंबरला रिलीज होणार आहे. सोबतच इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘द बॉडी’ हा पण १३ डिसेंबरला रिलीज होईल. तर २२ डिसेंबरला दबंग-३ आणि २७ डिसेंबरला गुड न्यूज रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी