पॉल रूड २०२१ चा सर्वाधिक सेक्सी पुरुष

Paul Rudd is People magazine’s ‘Sexiest Man Alive’ for 2021 पॉल रूड हा २०२१ चा सर्वाधिक सेक्सी पुरुष ठरला. पीपल्स मॅगझिनने पॉल रूडची सेक्सी पुरुष म्हणून निवड केली.

Paul Rudd is People magazine’s ‘Sexiest Man Alive’ for 2021
पॉल रूड २०२१ चा सर्वाधिक सेक्सी पुरुष 
थोडं पण कामाचं
  • पॉल रूड २०२१ चा सर्वाधिक सेक्सी पुरुष
  • सेक्सी पुरुष म्हणून निवड झाली तरी माझ्या स्वभावात मी मुद्दाम बदल करणार नाही - पॉल
  • पॉल रूड सध्या अॅपल टीव्ही प्लससाठी द श्रिंक नेक्स्ट डोअर या सीरिजमध्ये भूमिका करत आहे

Paul Rudd is People magazine’s ‘Sexiest Man Alive’ for 2021 । लॉस अँजेलिस: पॉल रूड हा २०२१ चा सर्वाधिक सेक्सी पुरुष ठरला. पीपल्स मॅगझिनने पॉल रूडची सेक्सी पुरुष म्हणून निवड केली. पॉलने मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स कंपनीच्या सिनेमांमध्ये तसेच क्लूलेस आणि दिस इज ४० सारख्या कॉमेडी सिनेमांमध्येही भूमिका केली आहे. 

मंगळवारी द लेट शो विथ स्टीफन कोलबर्ट या कॉमेडी कार्यक्रमात पीपल्स मॅगझिनने २०२१ साठी सेक्सी पुरुष म्हणून निवडलेल्या पॉल रूड याच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

सेक्सी पुरुष म्हणून निवड झाली तरी माझ्या स्वभावात मी मुद्दाम बदल करणार नाही. जसा आहे तसाच राहणार; असे पॉल रूडने सांगितले. ज्यावेळी पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी सर्वात मोठा धक्का माझ्या पत्नीला बसला. कारण तिला माझी या पुरस्कारासाठी निवड होईल असे वाटत नव्हते, असेही पॉलने सांगितले. आता माझे काही मित्र माझ्यावर नाराज होतील किंवा माझ्या विरुद्ध बोलण्याची शक्यता आहे, असेही पॉल गमतीने म्हणाला. पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे भविष्यात मला क्लूनी, पिट, बी. जॉर्डन यांच्यासोबत सेक्सी डीनर करण्याची तसेच दीर्घ काळ खासगी बोटींवर पार्टी करण्याची संधी मिळेल, अशी आशा पॉलने व्यक्त केली. 

पीपल्स मॅगझिनने सेक्सी पुरुषांची यादी जाहीर केली आहे. यात अनुक्रमे पॉल रूड, जॉन लीजेंड, ड्वेन जॉन्सन, क्रिस हेम्सवर्थ, इदरीस एल्बा, अॅडम लेविन, चॅनिंग टॅटम, डेव्हिड बेकहम यांचा समावेश आहे. 

पॉल रूड सध्या अॅपल टीव्ही प्लससाठी द श्रिंक नेक्स्ट डोअर या सीरिजमध्ये भूमिका करत आहे. या सीरिजचा प्रिमिअर १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल. घोस्टबर्स्टर्स : आफ्टरलाइफ या सीरिजमध्येही तो भूमिका करत आहे. लवकरच पॉल अँट मॅन अँड द वास्प : क्वांटुमेनिया या सिनेमात अँट मॅनची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी