[PHOTO]: अरे बापरे! तैमूरच्या पायाला झाली आहे दुखापत

बी टाऊन
Updated Feb 11, 2020 | 20:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

आज सकाळी त२मूरला सैफने आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते. तसं तर तैमूर याआधी अनेकदा सैफच्या खांद्यावर राइड करताना दिसला आहे. मात्र, यावेळचे कारण काही वेगळे होते. यावेळी तैमूरला पायाला पट्टी बांधल्याचे दिसून आले

[PHOTO] Taimur ali khan injures his leg
[PHOTO]: अरे बापरे! तैमूरच्या पायाला झाली आहे दुखापत  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान याच्या पायाला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
  • आज सकाळी त२मूरला सैफने आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते.
  • मीडियाने तैमूरला त्यांच्या राहत्या घराजवळ वांद्र्याजवळ फोटोमध्ये कॅप्चर केले आहे.

मुंबई: सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान याच्या पायाला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. तैमूर आधीपासूनच इंटरनेट सेन्सेशन राहिलेला आहे. आज सकाळी त२मूरला सैफने आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते. तसं तर तैमूर याआधी अनेकदा सैफच्या खांद्यावर राइड करताना दिसला आहे. मात्र, यावेळचे कारण काही वेगळे होते. यावेळी तैमूरला पायाला पट्टी बांधल्याचे दिसून आले आहे.

मीडियाने तैमूरला त्यांच्या राहत्या घराजवळ वांद्र्याजवळ फोटोमध्ये कॅप्चर केले आहे. या फोटोमध्ये तैमूर काहीसा गोंधळलेला दिसत आहे. याआधी त्याने कधी फोटोग्राफर्सना हसून पोझ दिली आहे हे सांगणं कठीण आहे कदाचित, यामुळेच सैफने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तैमूरला आता कॅमेरा आवडत नसल्याचे सांगत होता. “नो पिक्चर्स प्लीज” असे गेले काही दिवस सैफ मीडियाला सांगताना दिसत आहे.

तैमूरला कॅमेरा आवडत नाही तसा प्रसंगही खरं तर समोर आला आहे. तैमूर करीनासोबत त्यांच्या इमारतीच्या कंपाउंडमध्ये खेळत होता. तिथे मीडिया फोटोग्राफर्स होते त्यांना ही माहिती नव्हती. नकळतपणे जेव्हा तैमूर आणि करीना समोर मीडियासमोर आले आणि त्यांनी तैमूरचे फोटो काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी तैमूर जोरात नो असे ओरडला. यावेळी करीनाने लगेचच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पुन्हा नो असे म्हणत तो चिडला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला जाऊन फटाके फोडण्याचे प्रॉमिस मम्मा करीनाने केल्यावर तो शांत झाला आणि मीडियाने अगदी सावधपणे त्याचे फोटो काढले. त्यामुळे तैमूर लहान असताना जेवढा शांत दिसत होता तेवढाच तो आता मीडियापासून लांब पळत असल्याचे यातून दिसते.

तैमूरच्या पायाला दुखापत

दरम्यान, तैमूरला झालेली दुखापत नक्की कुठे आणि कशी झाली हे कळू शकले नाही मात्र, दुखापत फार गंभीर नाही एवढे नक्की.

अशाप्रकारे तैमूर दिवसेंदिवस खरंच खट्याळ होत चालल्याचे दिसत आहे. नुकताच सैफ आणि करीनाने तैमूरबाबत काही खुलासा केला आहे. त्यांनी तैमूरचा एक किस्सा सांगितला आहे. ईस्ट इंडिया कॉमेडी शोमधील मुलाखतीदरम्यान सैफने तैमूरचा हा किस्सा सांगितला आहे. “तैमूरला एकदा एक व्यक्ती नाही म्हणाली, तेव्हा त्याने मला तू आवडत नाही, तुला मी मारेन आणि दम देईन असे तो उलट म्हणाला. त्यावेळी मला कळलेच नाही की हे सर्व तैमूर कुठून शिकला”, असे सैफने तेव्हा सांगितले.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी