Shoaib Malik Divorce update : घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच शोएब मलिकचे अभिनेत्री आयशा उमरसोबतचे फोटो व्हायरल...सोशल मीडियावर खळबळ

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 13, 2022 | 13:13 IST

Viral Photos : पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकटपटू शोएब मलिक (Shoaib Malik)आणि भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza)यांच्या घटस्फोटाची प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगण्यात येते आहे. अभिनेत्री आयशा उमरसोबत (Ayesha Omar)शोएब मलिकचे फोटो समोर आले आहेत.

Shoaib Malik Viral Photo
शोएब मलिकचे आयेशा ओमरबरोबरचे फोटो 
थोडं पण कामाचं
  • शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा
  • शोएबचे आयशा ओमरसोबत अफेअरची चर्चा
  • आयशासोबतच शोएबचे फोटो झाले व्हायरल

Shoaib Malik Photos with  Ayesha Omar : नवी दिल्ली : सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींचे लग्न आणि घटस्फोट दोन्हीही चर्चेचे विषय असतात. सध्या पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकटपटू शोएब मलिक (Shoaib Malik)आणि भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza)यांच्या घटस्फोटाची प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा (Divorce) निर्माण झाल्याचे सांगण्यात येते आहे. सोशल मीडियावर तर सतत या दोघांबद्दल काहीतरी समोर येते आहे. मात्र आता दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर सानियाने तिचे दुबईतील घर सोडले असल्याची माहिती समोर येते आहे. एकीकडे हे सर्व घडत असताना आणि त्याची चर्चा होत असतानाच अभिनेत्री आयशा उमरसोबत (Ayesha Omar)शोएब मलिकचे फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. (Photos of Shoaib Malik with Ayesha Omar got viral on social media)

अधिक वाचा - Beautiful Skin Tips : सुंदर त्वचेसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा या गोष्टी...

समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, या प्रसिद्ध जोडप्याने एकमेकांपासून घटस्फोटही (Divorce)घेतला असल्याचे सांगण्यात येते आहे. इतके दिवस व्यवस्थित संसार सुरू असलेल्या सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यातील मतभेद आणि भांडणाची बातमी समोर आल्यावर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. या दोघांचे लग्न 12 वर्षांपूर्वी झाले होते. या दोघांना इझान मलिक नावाचा मुलगा आहे. शोएब आणि सानियाचे लग्न 2010 मध्ये झाले होते.

अधिक वाचा - Hair Care Tips: सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? मग करा हे सोपे घरगुती उपाय

शोएबचे अभिनेत्रीसोबतचे फोटो व्हायरल

शौएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची चर्चा आणि त्यामागची कारणे यांची चर्चा होत असतानाच शोएबचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. शोएब मलिक आणि आयेशा उमरच्या काही फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या फोटोमध्ये दोघांमध्ये काहीतरी जवळीक असल्याचे दिसून येते आहे. शोएब आणि सानियाकडून घटस्फोटाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र समोर आलेल्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर घटस्फोटाचे कारण आयशा उमर असल्याचीही चर्चा सुरू आहे. आयशा उमरमुळेच शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा दावा सोशल मीडियावरील यूजर्स करत आहेत. हे व्हायरल झालेले शोएबचे फोटो आयेशा उमरसोबत 2021 मध्ये एका मॅगझिनसाठी फोटोशूट करताना काढण्यात आले होते.

अधिक वाचा-  Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेसाठी भारतीय कुटुंब थेट लंडनहून आले

शोएबचे आयेशा उमरसोबतचे फोटो पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध मासिकासाठी करण्यात आले आहे. शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची बातमी जसजशी पसरली तसतशी सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. त्यानंतर अभिनेत्री आयशा उमरसोबतचे शोएबचे फोटो व्हायरल होऊ लागले आणि या दोघांमध्ये काहीतरी अफेअर सुरू असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. आता या फोटोंवर युजर्सच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत.

शोएब आणि सानिया मिर्झाने अधिकृतपणे अद्याप काहीही जाहीर केलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमधून याची चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी