PK actor death: ‘पीके’ सिनेमातील या अभिनेत्याचे निधन

बी टाऊन
Updated May 13, 2020 | 14:52 IST | टाइम्स नाऊ हिंदी

पीके, बाजार यासारख्या सिनेमांत अभिनय केलेला अभिनेता साई गुंडेवरचे ब्रेन कॅन्सरने निधन झाले आहे. तो ४२ वर्षांचा होता. गेल्या वर्षापासून अमेरिकेत त्याच्यावर उपचार सुरू होते.

sai gundewar
अभिनेता साई गुंडेवरचे निधन 
थोडं पण कामाचं
  • अभिनेता साई गुंडेवरचे वयाच्या ४२व्या वर्षी ब्रेन कॅन्सरमुळे निधन झाले
  • या अभिनेत्यावर गेल्या वर्षापासून अमेरिकेत उपचार सुरू होते
  • अभिनेत्याने पीके, बाजार सारख्या सिनेमांत काम केले

मुंबई: बॉलिवूड अभिनेता साई गुंडेवरचे रविवारी अमेरिकेत निधन झाले. ४२ वर्षीय साईवर गेल्या वर्षापासून अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये ब्रेन कॅन्सरवर उपचार सुरू होते. मात्र त्याला जीवनाच्या लढाईत हार पत्करावी लागली. साईच्या पश्चात त्याची पत्नी आणि आई-वडील आहेत.

साईने गेल्या वर्षी सोशल मीडियावर आपल्या आजाराशी संबंधित अनेक पोस्ट टाकल्या होत्या. तसेच आपले फोटोही पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये तो पूर्णपणे वेगळा दिसत आहे. कॅन्सरमुळे त्याच्या शरीरात झालेले बदल या फोटोतून स्पष्टपणे दिसत आहेत. साई गेल्या ७ महिन्यांपासून सोशल मीडियापासून दूर होता. त्याने सोशल मीडियावर अखेरची पोस्ट २५ ऑक्टोबरला केली होती. यात त्याने आपला फोटोही टाकला होता.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे ट्वीट

साईच्या निधनानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना केली. पी. के सारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते साईप्रसाद गुंडेवर यांची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली. त्याच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने हरहुन्नरी अभिनेता गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! असे देशमुख यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

२०१०मध्ये साईला प्रसिद्धी मिळाली होती ती स्पिल्ट्सव्हिला ४मधून. यात तो स्पर्धक होता. साई गुंडेवरने अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. त्याने आमिर खानच्या पीके या सिनेमातही भूमिका साकारली होती. याशिवाय रॉक ऑन, लव्ह ब्रेकअप जिंदगी, डेविड, आय मी और मै आणि बाजार या सिनेमांत त्याने भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय क्याने मराठी ए डॉट कॉम मॉम मध्येही मुख्य भूमिका साकारली होती. मात्र सैफ अली खान, राधिका आपटे आणि चित्रांगदा सिंगचा सिनेमा बाजारमधील साईच्या भूमिकेला विशेष ओळख मिळाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी