Ponniyin Selvan-1 OTT release : मणिरत्नमचा 'पोन्नियन सेल्वन' ऑक्टोबरमध्येच 'या'OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

बी टाऊन
Updated Oct 26, 2022 | 20:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ponniyin Selvan-1 OTT release : थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता मणिरत्नमचा 'पोन्नियन सेल्वन' (Ponniyin Selvan-1) हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ऑक्टोबरमध्येच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. जाणून घ्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर 'पोन्नियन सेल्वन' रिलीज होणार आहे.

 Ponniyin Selvan-1 kantara will release on OTT
'पोन्नियन सेल्वन' सिनेमा 'या' ओटीटीवर रिलीज होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'पोन्नियन सेल्वन' सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार
  • अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार पोन्नियन सेल्वन
  • कांतारा सिनेमाही ओटीटीवर होणार रिलीज

Ponniyin Selvan-1 OTT release : मणिरत्नमच्या (Maniratnam) पोन्नियन सेल्वनने  (Ponniyin Selvan-1) रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड केले आहेत. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 80 कोटींची कमाई केली होती. त्यानंतरच या सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम केले. केवळ 5 दिवसांमध्ये या सिनेमाने 300 कोटींचा टप्पा पार केला. मणीरत्नमचा 'पोन्नियन सेल्वन'तामिळ बॉक्स ऑफिसवर अजूनही रेकॉर्ड मोडत आहे. या सिनेमाने तामिळनाडूमध्ये 150 कोटी कमावले आहेत. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. (Ponniyin Selvan-1 kantara will release on OTT)

'पोन्नियन सेल्वन' हा सिनेमा 30 सप्टेंबरला रिलीज झाला होता. या सिनेमाने जगभरात 450 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड पंडितांच्या मते हा सिनेमा लवकरच 500 कोटींचा टप्पा गाठेल असे म्हटले जात आहे. ऑक्टोबरमध्येच हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा सर्व भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 

अधिक वाचा : राम सेतू सिनेमाचे फर्स्ट डे कलेक्शन

मणिरत्नमचा 'पोन्नियन सेल्वन'  भाग १ हा चोल साम्राज्यावर आधारित आहे. या सिनेमाची कथा कल्की कृष्णमूर्ती यांच्या पोनियन सेल्वन या कादंबरीवरून घेण्यात आली आहे. ही कादंबरी 1995 मध्ये प्रकाशित झाली होती. 'पोन्नियन सेल्वन'   भाग १ हा मणिरत्नम यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे.

चियान विक्रम आणि ऐश्वर्या व्यतिरिक्त जयराम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, प्रकाश राज आणि शोभिता धुलिपाला हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाचे संगीत ऑस्कर पुरस्कार विजेते ए आर रहमान यांनी दिले आहे. आता मणिरत्नम आता 'पोन्नियन सेल्वन'भाग 2 ची तयारी करत आहे.


कांतारा (Kantara movie) हा सिनेमाही येत्या 4 नोव्हेंबरला ओटीटीवर रिलीज  (Kantara oOTT Release Date) होणार असल्याची माहिती आहे. हा सिनेमा कर्नाटकमध्ये 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई (Box office collection) केली होती. सिनेमाने हिंदीमध्ये रिलीज झाल्यावरही तिकीट बारीवर चांगली कमाई केली आहे. येत्या 4 नोव्हेंबरला हा सिनेमा अ‍ॅमेझॉनवर प्राइमवर रिलीज होणार आहे. 

अधिक वाचा :  रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमाचं पोस्टर रिलीज

या सिनेमात किशोर, अच्युत्य कुमार, प्रकाश थुमिनाद, प्रमोद शेट्टी आणि नवीन डी पाटील यांनी काम केले आहे. Kiragandur यांनी Hombale Films च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली आहे. KGF सिनेमाही याच बॅनरखाली बनवण्यात आला होता. किचा सुदीप, धनुष, प्रशांत नीलपासून ते प्रभासपर्यंत साऱ्यांनीच या सिनेमाचे कौतुक केले आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी