मणिरत्नमच्या चित्रपटात 'कटप्‍पा' सोबत रोमांस करताना दिसेल ऐश्वर्या! 

बी टाऊन
Updated Apr 19, 2019 | 21:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्य आगामी चित्रपटात ऐश्वर्या राय आणि ‘कटप्पा’ या भूमिकेनं प्रसिद्ध झालेले अभिनेते सत्यराज एकत्र दिसणार आहे. या फिल्ममध्ये ऐश्वर्या राय बच्चनबरोबर अमिताभ बच्चन सुद्धा दिसू शकतात.

Satyaraj and Aishwarya Rai Bachhan
मणिरत्नमच्या चित्रपटात 'कटप्‍पा' सोबत रोमांस करतांना दिसेल ऐश्वर्या!   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: सुपर डुपर हिट फिल्म 'बाहुबली'चं नाव घेतलं तर या फिल्ममधील हिरो प्रभास जसा डोळ्यांसमोर येतो, तसंच यातील कटप्पाची भूमिका करणाऱ्या सत्यराजलाही कोणी विसरू शकत नाही. सत्यराजच्या या भूमिकेनं संपूर्ण देशाला वेड लावलं. या भूमिकेनं सत्यराज रातोरात स्टार झाला. आता सत्यराजबद्दल आणखी एक जबरदस्त बातमी येत आहे. ती म्हणजे 'बाहुबली' फेम सत्यराज आता ऐश्वर्या राय बच्चनबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटलं ना! पण हे खरं आहे. ऐश्वर्या राय बच्चन तिच्या आगामी फिल्ममध्ये सत्यराजबरोबर रोमान्स करताना दिसेल. दिग्दर्शक मणिरत्नमच्या आगामी बिग बजेट फिल्म 'पोन्निनी सेल्वम'मध्ये या दाक्षिणात्य अभिनेत्याची एंट्री झालेली आहे. सत्यराज या फिल्ममध्ये ऐश्वर्याच्या नवऱ्याची भूमिका साकारणार असल्याची बातमी समोर येत आहे.

या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन तर आहेत पण तिचे सासरे बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. बातमी आहे की, दिग्दर्शकांनी या फिल्मसाठी अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन दोघांनाही अॅप्रोच केलेलं आहे. आता या फिल्मसाठी बिग बी हो म्हणतायेत की नाही हे काही दिवसात समजेलच. पण बिग बींच्या साऊथ इंडस्ट्रीतील डेब्यूनंतर ते या फिल्मला नक्कीच हो म्हणण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

खरं तर मणिरत्नमची ही मल्टिस्टारर फिल्म एक बिग बजेट फिल्म आहे. या फिल्मची कहाणी एका तमिळ कादंबरीवर आधारित आहे. ऐश्वर्या राय बच्चन या फिल्ममध्ये एका राजकन्येची भूमिका साकारत आहे. या राजकन्येचं लग्न एका राजाशी होतं. पण ती आपल्या ताकदीचा अयोग्य वापर करते.

सत्यराजनं आपल्या सक्षम अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. एका भूमिकेनं या साऊथ स्टारनं रातोरात रसिकांच्या मनात घरं केलं आणि आपली ओळख बनवली. एसएस राजामौलीची फिल्म 'बाहुबली' मध्ये 'कट्टप्पा' ची भूमिका एका शूर-वीर आणि साहसी योद्ध्याची होती. जो आपल्या राजासाठी प्रामाणिक असतो. विशेष म्हणजे 'बाहुबली द बिगनिंग' नंतर या फिल्मचा दुसरा भाग 'बाहुबली द कन्क्लूजन'च्या रिलीजपर्यंत संपूर्ण देशामध्ये एकच प्रश्न विचारला जात होता 'आखिर कट्टप्पा ने बाहुबली को क्यों मारा?'

 

याशिवाय सत्यराज यांना बाहुबली चित्रपटाच्या यशानंतर आणखी एक गिफ्ट मिळालं. ते म्हणजे सत्यराज यांचा मेणाचा पुतळा आता लंडनच्या मादाम तुसाँ म्यूझिअममध्ये दिसेल. यात ते ‘कटप्पा’च्या वेशात असतील. याबाबत त्यांनी आपला आनंद काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून शेअर केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मणिरत्नमच्या चित्रपटात 'कटप्‍पा' सोबत रोमांस करताना दिसेल ऐश्वर्या!  Description: प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्य आगामी चित्रपटात ऐश्वर्या राय आणि ‘कटप्पा’ या भूमिकेनं प्रसिद्ध झालेले अभिनेते सत्यराज एकत्र दिसणार आहे. या फिल्ममध्ये ऐश्वर्या राय बच्चनबरोबर अमिताभ बच्चन सुद्धा दिसू शकतात.
Loading...
Loading...
Loading...