१५ दिवसातच लग्न मोडण्याचा निर्णय, Poonam Pandey म्हणते पती जनावरासारखा झोडतो! 

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Sep 24, 2020 | 20:12 IST

Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडे हिने पती सॅम बॉम्बेसोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे.  लग्नाच्या अवघ्या १५ दिवसानंतरच पूनमने पतीपासून वेगळी होणार आहे.

Poonam-Pandey
१५ दिवसातच लग्न मोडण्याचा निर्णय, Poonam Pandey म्हणते...   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • पूनम पांडेचा पतीवर गंभीर आरोप 
  • पतीने मारहाण केल्याप्रकरणी पूनमची पोलिसात तक्रार 
  • लग्नाच्या १५ दिवसातच लग्न मोडण्याचा निर्णय 

मुंबई: वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिने या महिन्याच्या सुरुवातीला तिचा प्रियकर सॅम बॉम्बे (Sam Bombay) याच्यासोबत लग्न (Marriage) केलं होतं. मात्र, हनीमूनला (Honeymoon) गेलेले असताना पतीने मारहाण केल्याचा गंभीर आरोप पूनमने आपल्या पतीवर केला आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकलेली पूनम आात हे लग्न मोडण्याचा निर्णयापर्यंत पोहचली आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार पूनम पांडे म्हणाली- 'मी हे अपमानजनक नातं पुढे सुरु ठेवण्याचं ठरवलं होतं. मला वाटत होतं की, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. पण, आता मी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.'

पूनम पांडे हिच्या म्हणण्यानुसार- 'या अपमानजनक नात्याच्या बंधनात अडकून राहण्याऐवजी मी एकटं राहणं पसंत करेन. जो माणूस जनावरासारखं मारहाण करतो त्याच्याकडे परत जाण्यात काहीही अर्थ नाही. एवढेच नाही तर त्याने माझे केस पकडून मला पलंगावर आपटलं.' 

पूनम पांडेच्या पतीला मिळाला जामीन

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याला 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. सॅमला चार दिवसांचा जामीन मंजूर झाला असून, त्याला गोव्याच्या कॅनाकोना पोलीस ठाण्यात हजर व्हावं लागणार आहे.

कॅनाकोना पोलीस स्टेशनचे निरीक्षक तुकाराम चव्हाण म्हणाले की, 'पूनम पांडे हिने सोमवारी रात्री उशिरा पती सॅम बॉम्बे विरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पीडितेची वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.'

१ सप्टेंबर रोजी झालं होतं लग्न 

पूनम पांडे यांनी १ सप्टेंबर रोजी सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. पूनमने लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली होती. लग्नाआधी हे दोघेही दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

बॉम्बे टाइम्सशी बोलताना पूनम पांडे म्हणाली- 'माझी आणि सॅमची ओळख ही एका प्रोजेक्टदरम्यान झाली होती.  यानंतर सर्व काही एका बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटासारखे घडलं. आम्ही दोघेही बर्‍याच बाबतीत एकसारखे आहोत. तो माझा सर्वात चांगला मित्र आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी