पूनम पांडेला शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलांची वाटते काळजी

अॅडल्ट कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री पूनम पांडे हिला शिल्पा शेट्टी आणि तिच्या दोन मुलांची काळजी वाटू लागली आहे.

poonam pandey express concern for shilpa shetty and her two kids after raj kundra arrest in pronagraphy case
पूनम पांडेला शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलांची वाटते काळजी 

थोडं पण कामाचं

  • पूनम पांडेला शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलांची वाटते काळजी
  • शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म निर्मितीच्या प्रकरणात अटक
  • राज कुंद्रा याच्यावर पॉर्न व्हिडीओ निर्मिती करणे तसेच अन्य गंभीर आरोप

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म निर्मितीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्रा याच्यावर पॉर्न व्हिडीओ निर्मिती करणे तसेच अन्य गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात नवनवी माहिती उजेडात येत आहे. पॉर्न व्हिडीओ प्रकरणाशी संबंधित काही सेलेब्रिटी आणि मॉडेल यांचे नाव पुढे येत आहेत. सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या या प्रकरणामुळे अॅडल्ट कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री पूनम पांडे हिला शिल्पा शेट्टी आणि तिच्या दोन मुलांची काळजी वाटू लागली आहे. poonam pandey express concern for shilpa shetty and her two kids after raj kundra arrest in pronagraphy case

पूनम पांडेने मुंबईच्या उच्च न्यायालयात (हायकोर्ट ऑफ बॉम्बे) राज कुंद्रा याच्याविरोधात याचिका केली आहे. प्रकरण न्यायालयात असल्यामुळे त्यावर जास्त माहिती देणे पूनमने टाळले. पण राज कुंद्राला अटक झाल्यानंतर सतत मीडियातून हा विषय हाताळला जात आहे. यामुळे शिल्पा शेट्टी आणि तिच्या दोन्ही मुलांच्या होणाऱ्या मानसिक त्रासाची कल्पना करुन पूनम अस्वस्थ झाली आहे. तिला शिल्पा शेट्टी आणि तिच्या दोन मुलांची काळजी वाटू लागली आहे. ही चिंता पूनमने जाहीर केली.

शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलांचा विचार करुन खूप वाईट वाटत आहे. या सगळ्यांना अशा स्वरुपाचा त्रास कधी सहन करावा लागेल, असे वाटले नव्हते. यामुळेच संधी साधून मी स्वतःला मिळालेल्या वागणुकीची माहिती देऊ इच्छीत नाही. न्यायालयातले विषय न्यायालयातच हाताळणे योग्य ठरेल; असे पूनम म्हणाली.

पूनम पांडेने राज कुंद्रा विरोधात २०१९ मध्ये तक्रार दाखल केली होती. तसेच मुंबईच्या उच्च न्यायालयात फसवणूक आणि चोरीच्या प्रकरणात राज विरोधात याचिका केली होती. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. तपासातून पोलिसांच्या हाती येणारी माहिती न्यायालयापुढे येणार आहे. यामुळेच या विषयावर सार्वजनिकरित्या बोलणे टाळत असल्याचे पूनमने सांगितले. पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे पूनम पांडे म्हणाली.

अॅडल्ट कंटेंटमुळे चर्चेच राहणाऱ्या पूनम पांडेने २०१९ मध्ये राज कुंद्रा आणि त्याची सहयोगी कंपनी आर्म्सप्राइम मीडिया यांच्याविरोधात याचिका केली आहे. राज कुंद्रा आणि आर्म्सप्राइम मीडिया माझ्यासाठी एक अॅप हाताळत होते. या संदर्भातल्या कराराची मुदत संपली आणि त्यांच्यासोबत नवा करार झाला नाही. पण राज कुंद्रा आणि आर्म्सप्राइम मीडिया आजही माझा कंटेंट बेकायदेशीररित्या हाताळत आहेत; असा आरोप पूनम पांडेने केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी