Big Budget Film: स्वत: निर्माता भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी पुष्टी केली आहे की त्यांचा आगामी चित्रपट आदिपुरुषचे (Adipurush) बजेट 500 कोटी रुपये आहे. बजेटमुळे त्यांचा चित्रपट चांगला चालेल, याचा अंदाज निर्माते भूषण कुमार यांना आहे.मात्र, प्रत्यक्षात काय घडणार हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल. सध्या साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आदिपुरुषमुळे खूप चर्चेत आहे. त्याच्या बाहुबली (Bahubali) चित्रपटापेक्षा जास्त बजेटमध्ये आदिपुरुष बनवला जात आहे.500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये आदिपुरुष तयार करण्याचे निर्मात्यांनी ठरवले आहे.
आदिपुरुष हा प्रभासच्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याआधी प्रभासने बाहुबली पार्ट 1 आणि बाहुबली पार्ट 2 या दोन्ही चित्रपटात काम केले होते. पहिल्या भागात 180 कोटी आणि दुसऱ्या भागात 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आदिपुरुष हा चित्रपट भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.
अधिक वाचा : रेल्वे प्रवाशांसाठी सुरु होतंय ‘पॉड हॉटेल’, वाचा सविस्तर
त्याच वेळी, चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना अशी अपेक्षा आहे की या चित्रपटाची सुरुवात अतिशय नेत्रदीपक असेल आणि जगभरातील त्याचे शो हाऊसफुल्ल होतील.
हा सिनेमा ब्लॉकबस्टर होण्यासाठी ते कोणतीही कसर सोडू इच्छित नाही,असं मतं सिनेमाचे निर्माते भूषण कुमार यांनी मांडले आहे. त्यामुळे असा हा बिग बजेट सिनेमा प्रेक्षक नक्कीच बघायला येतील असा विश्वास निर्माते आणि दिग्दर्शकाला आहे.
दिग्दर्शक ओम राऊत यांनी सांगितले की त्यांनी या चित्रपटासाठी प्रभासची निवड केली कारण त्यांच्या डोळ्यात रामाचे प्रतिबिंब दिसत आहे. प्रभास एक शुद्ध आत्मा आहे ज्याचे डोळे खूप शांत आहेत. त्याच्या डोळ्यांमुळेच त्यांना प्रभासमधील रामाची कल्पना दिसत होती. त्यामुळे प्रभास या व्यक्तिरेखेसाठी परफेक्ट आहे.
अधिक वाचा : IND vs SA: टीम इंडियात युवराजची कमतरता पूर्ण करणार हा खेळाडू
ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रामायणावर आधारित आहे.या चित्रपटात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात प्रभासशिवाय सैफ अली खान, क्रिती सेनॉन आणि सनी सिंग दिसणार आहेत. क्रिती सेनन माता सीतेची भूमिका चित्रपटात साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी जगभरातील 20 हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील कोणत्याही चित्रपटापेक्षा हा चित्रपट जगभरात रिलीज होणारा सर्वात मोठा चित्रपट असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.