Prabhas movie update : प्रतीक्षा संपणार, प्रभासच्या राधे श्यामचा ट्रेलर आज होणार रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

बी टाऊन
Updated Dec 23, 2021 | 17:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Prabhas movie Readhe Shyam trailor will relaese toaday : प्रभासच्या राधे श्यामचा ट्रेलर आज रिलीज होणार आहे. चाहत्यांनाही प्रभासच्या या सिनेमाच्या ट्रेलरची खूपच उत्सुकता आहे. पूजा हेगडे आणि प्रभास या सिनेमात पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार आहेत.

Prabhas's Radhe Shyam's trailer will be released today
बहुप्रतिक्षित राधे-श्यामचा ट्रेलर आज रिलीज होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राधे श्यामचा ट्रेलर आज रिलीज होणार
  • पूजा हेगडे आणि प्रभास प्रमुख भूमिकेत
  • जानेवारी 2022मध्ये सिनेमा रिलीज होणार

Prabhas movie Readhe Shyam trailor will relaese toaday : चाहते आणि प्रेक्षक 'राधे श्याम' रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. राधे श्याम हा एक रोमँटिक सिनेमा आहे. या सिनेमात पूजा हेगडे आणि प्रभासची जोडी दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. प्रभासच्या या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांना प्रभासची रोमँटिक भूमिका पहायला मिळणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)


"मी देव नाही, पण मी तुमच्यापैकी नाही." प्रभासच्या या उत्कंठा वाढवणाऱ्या डायलॉगने राधे श्याम या चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.  'राधे श्याम'चा बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर अखेर आज रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

Prabhas 20 titled as 'Radhe Shyam': Prabhas and Pooja Hegde strike a romantic pose in the first look

राधे श्यामचा ट्रेलर आज रिलीज होणार 

आतापर्यंत आपण 'विक्रम आदित्य' या रहस्यमय प्रेमी मुलाच्या रूपात पराक्रमी प्रभासची काही झलक पाहिली आहेत. ज्याला असाधारण म्हणता येईल. जे आपण भारतीय चित्रपटात पाहिलेले नाही. ही एका अनोख्या प्रेमकथेची कहाणी आहे. ही कथा कशी उघड होणार आणि रहस्य कसे उलगडणार हे सिनेमात दिसेलच, मात्र, त्याआधी त्याची छोटीशी झलक या ट्रेलरमध्ये दिसणार आहे. राधे श्याम हा एक रोमँटिक सिनेमा आहे. या सिनेमात पूजा हेगडे आणि प्रभासची जोडी दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. प्रभासच्या या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांना प्रभासची रोमँटिक भूमिका पहायला मिळणार आहे. 


'राधेश्याम' 14 जानेवारी 2022 रोजी सिल्व्हर स्क्रीनवर रिलीज होणार आहे. हा एक बहुभाषिक चित्रपट आहे,  राधा कृष्ण कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरीजने सादर केले आहे. हे UV Creations द्वारे निर्मित आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. सिनेमातील गाणी रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. मात्र, आता सिनेमाचा ट्रेलर प्रत्यक्ष सिनेमाबद्दल उत्सुकता वाढवण्यात कितपत यशस्वी ठरतो तेच पाहावं लागेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी