Short Film Festival in Mumbai : प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

Prabodhan International Short Film Festival in Mumbai : यंदा शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

Prabodhan International Short Film Festival in Mumbai
प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव 
थोडं पण कामाचं
  • प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव
  • शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या अंतिम फेरीचे आयोजन
  • अंतिम फेरीप्रसंगी अभिनेते संदीप कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील

Prabodhan International Short Film Festival in Mumbai : मुंबईः यंदा शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. अंतिम फेरी दादर येथे पु. ल. देशपांडे अकादमीत होणार आहे. यावेळी १५ लघुपट बघण्याची संधी उपलब्ध होईल. अकादमीत होणार असलेल्या अंतिम फेरीप्रसंगी अभिनेते संदीप कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत महोत्सवाची अंतिम फेरी पार पडेल. यानंतर संध्याकाळी ५.३० ते ६.३० या कालावधीत  सांगता सोहळा होईल. हा सोहळा https://www.facebook.com/prabodhanisff या लिंकवर लाइव्ह बघता येईल.

'प्रबोधन गोरेगाव' या १९७२ मध्ये स्थापन झालेल्या आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ आदी क्षेत्रात काम करत असलेल्या संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”चे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या विभागांचे कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शखाली महोत्सव होत आहे.

लघुपट करणार्‍या व करू इच्छिणार्‍या जगभरातील मराठी कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने लघुपटांच्या निर्मितीसोबत त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सहभाग घेण्याबाबतचे मार्गदर्शनही देण्यात येणार आहे. प्रख्यात जागतिक कीर्तीचे चित्रपट समीक्षक, अभ्यासक व दिग्दर्शक अशोक राणे हे ‘महोत्सव संचालक’ म्हणून कार्यभार पहात आहेत तर मंगेश मर्ढेकर यांनी या महोत्सवाच्या ‘कार्यक्रम संचालक’पदी योगदान दिले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्‍या गोदावरी या मराठी चित्रपटाचे अभिनेते जितेंद्र जोशी व दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष सन्मान व गौरव महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी