प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Prathyusha Garimella found dead in Banjara Hills apartment check Celebrity fashion designer death news in Marathi : टॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गॅरिमेला हिचा मृतदेह घरात बाथरूममध्ये आढळला. प्रत्युषाचे घर हैदराबादच्या बंजारा हिल्स या भागात आहे.

Prathyusha Garimella found dead in Banjara Hills apartment check Celebrity fashion designer death news in Marathi
प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह
  • टॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गॅरिमेला हिचा मृतदेह घरात बाथरूममध्ये
  • प्रत्युषाचे घर हैदराबादच्या बंजारा हिल्स या भागात

Prathyusha Garimella found dead in Banjara Hills apartment check Celebrity fashion designer death news in Marathi : टॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गॅरिमेला हिचा मृतदेह घरात बाथरूममध्ये आढळला. प्रत्युषाचे घर हैदराबादच्या बंजारा हिल्स या भागात आहे. पोलिसांनी प्रत्युषाच्या मृत्यूची संशयास्पद अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. तसेच पोलिसांनी प्रत्युषाच्या ओळखीतल्यांना घटनेची माहिती दिली आहे. प्रत्युषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे. 

बाथरूममध्ये प्रत्युषाचा मृतदेह शनिवार ११ जून २०२२ रोजी आढळला. प्रुत्युषाच्या खोलीत कार्बन मोनॉक्साईडचा सिलेंडर आढळला. या सिलेंडरमधूल वायू श्वसनाद्वारे शरीरात गेल्यामुळे प्रत्युषाचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. यासाठीच पोलीस शवविच्छेदनाचा अहवाल अर्थात पोस्टमॉर्टेम रिपोर्ट येण्याची वाट बघत आहेत. 

Photos of Prathyusha Garimella, Film Nagar, Hyderabad | June 2022

प्रत्युषाने फॅशन डिझायनर म्हणून टॉलिवूड आणि बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसाठी काम केले आहे. तिने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम अमेरिकेत पूर्ण केला आणि हैदराबादमधून करिअर सुरू केले. प्रत्युषाने २०१३ मध्ये स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू केला. पोलीस प्रत्युषाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी