मुंबई: बॉलिवुड अभिनेत्री (Bollywood actress) प्रीती झिंटाच्या (Preity Zinta) भाऊ (brother) आणि आईला (mother) गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग (corona infection) झाला होता. आता त्यांची चाचणी निगेटिव्ह (test negative) आली आहे. प्रीती झिंटाने सोशल मीडियावर (social media) एक भलीमोठी पोस्ट (long post) लिहून सांगितले आहे की ती त्यावेळी अमेरिकेत (USA) होती आणि तिथे तिला अतिशय असहाय्य (helpless) वाटत होते.
प्रीती झिंटाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले आहे, “तीन आठवड्यांपूर्वी माझी आई, भाऊ, वहिनी आणि त्यांची मुले, काकांसह सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.”
पुढे ती लिहिते, “अचानक व्हेंटिलेटर, आयसीयू आणि ऑक्सिजन मशीन यासारख्या शब्दांना नवा अर्थ मिळाला. मी तेव्हा अमेरिकेत होते आणि मला प्रचंड असहाय्य वाटत होते. माझ्यापासून खूप दूर रुग्णालयात हे याच्याशी लढत होते.” यासोबतच तिने देवाचे, डॉक्टरांचे आणि परिचारकांचे आभारही मानले आहेत.
प्रीतीने पुढे लोकांना सल्ला देत लिहिले आहे, “आपण कोरोनाला कृपया गंभीरपणे घ्या. हा आजार एका रात्रीत होऊ शकतो. मास्क घाला, नियमांचे पालन करा.” तिने पुढे लिहिले आहे, “मला आज कळले की सगळ्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता मी शांतपणे झोपू शकेन, आता मी माझी काळजी थांबवू शकेन. आता मला नवे वर्ष चालू झाल्यासारखे वाटत आहे.”
प्रीती ही सध्या आपल्या पतीसोबत विदेशात स्थायिक झाली आहे. सध्या ती एका वेबसीरीजमध्ये दिसणार आहे ज्याची निर्मिती ऋतिक रोशन प्रोडक्शन्स करणार आहे.