Prem Chopra Reaction : Prem Chopra Reaction : स्वत:च्याच मृत्यूच्या अफवांवर प्रेम चोप्रा यांची प्रतिक्रिया; म्हणाले,''हे फारच...''

बी टाऊन
Updated Jul 28, 2022 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Prem Chopra Reaction : बॉलिवूडमधील खलनायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेता प्रेम चोप्रा ( Prem Chopra ) यांनी अलीकडेच त्यांच्या मृत्यूच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मृत्यूच्या अफेवमुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना खूप त्रास सहन करावा लागला. अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये असेही ते म्हणाले.

Prem Chopra reacted to his death rumours news
प्रेम चोप्रा यांच्या मृत्यूची अफवा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मृत्यूच्या अफवेच्या बातमीवर प्रेम चोप्रा यांची प्रतिक्रिया
  • मृत्यूची अफवा पसरवणे यासारखे वेदनादायक दुसरे काहीच नसल्याची प्रेम चोप्रा यांची प्रतिक्रिया
  • दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा एकदम फिट आणि तंदुरुस्त आहेत.

Prem Chopra Reaction :  सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या मृत्यूच्या अफवेच्या बातमीला बळी पडतात आणि ही काही नवीन गोष्ट नाही. अलीकडेच, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा ( Prem Chopra ) त्यांच्या मृत्यूच्या अफवेला बळी पडले. इंटरनेटवर त्यांच्या मृत्यूच्या बातम्या येऊ लागल्यानंतर प्रेम चोप्रा यांचे कुटुंबीय आणि त्यांना अनेक कॉल्स आहे. अनेकांना हे खोटं असून निव्वळ अफवा असल्याचं प्रेम चोप्रांनी स्वत:चं सांगितलं. ( Prem Chopra reacted to his death rumours news as this is sadism what else )


27 जुलै (बुधवार) रोजी, प्रेम चोप्रा, यांच्या मृत्यूच्या अफेवेची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. आणि त्यानंतर प्रेम चोप्रा यांनी स्वत:च या घटनेचा उलगडा केला. अशा प्रकारे स्वत:च्या मृत्यूच्या अफवेची बातमी येणं याला त्यांनी "सॅडिझम" म्हटले. राकेश रोशन ( Rakesh Roshan ) यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता आणि त्याच कारणासाठी त्यांना अनेक फोन येत असल्याचेही त्यांनी उघड केले.


टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले, "हे अतिशय वेदनादायी आहे, दुसरं काय! कोणीतरी चुकीची माहिती देऊन माझ्या मृत्यूची अफवा पसरवत आहे. पण मी इथे आहे, तुमच्याशी बोलतोय, अगदी मनापासून."

अधिक वाचा : ४५ वर्षीय करोडपती महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने....

"सकाळपासून मला अशा स्वरूपाचे किती कॉल आले आहेत हे मला माहीत नाही. राकेश रोशनने मला कॉल केला. आमोद मेहरा (ट्रेड अॅनालिस्ट) यांनी कॉल केला. मला आश्चर्य वाटते की माझ्यासोबत हे कोणी केले. जितेंद्र या माझ्या जवळच्या मित्रासोबत हे असेच घडले होते. सुमारे चार महिन्यांपूर्वी  त्यांच्यासोबतही असेच घडले होते, अशा प्रकारे फेक बातम्या येणे थांबले पाहिजे" असेही प्रेम चोप्रा म्हणाले. 

आमोद मेहरा यांनी देखील ट्विटरवर शेअर केले आहे की, "प्रेम चोप्रा यांच्या मृत्यूची अफवा ज्यांनी पसरवली आहे त्यांनी कृपया हे लक्षात ठेवा, मी प्रेम चोप्रा यांच्याशी बोललो आहे आणि ते एकदम
ठणठणीत आहेत.  सर, जुग जुग जीओ… तुम्हाला दीर्घायुष्य लाभो जय माता दी."

अधिक वाचा : तुमचा आयफोन डुप्लिकेट तर नाही ना?

दरम्यान, प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना जानेवारी २०२२ मध्ये कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या जोडप्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात आला.

प्रेम चोप्रा यांनी दोस्ताना (1980), क्रांती (1981), जानवर (1982), शहीद (1965), उपकार (1967), पूरब और पश्चिम, दो रास्ते (1969), कटी पतंग (1970), दो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दो अंजाने, जादूटोणा, काला सोना या सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी