Pushpa 2: पुष्पा 2 ची तयारी जोरात सुरू, बॉलिवूडची ही अभिनेत्री करणार अॅटम साँग

बी टाऊन
भरत जाधव
Updated Apr 06, 2022 | 16:10 IST

ल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटाने यावर्षी चांगलीच कमाई केली. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला आणि हिंदीतही १०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाची श्रीवल्ली, सामी सामी आणि ऊं अंटावा सारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर (social media) ही सर्व गाणे खूप लोकप्रिय झाली असून मोठी धूम या गाण्यांनी केली आहे.

Preparations for Pushpa 2 are in full swing
Pushpa 2: पुष्पा 2 ची तयारी जोरात सुरू  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पुष्पा 2 2023 मध्ये रिलीज होणार आहे.
  • चित्रपटाची तीन गाणी तयार झाली आहेत आणि ती रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
  • देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे.

नवी दिल्ली : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटाने यावर्षी चांगलीच कमाई केली. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला आणि हिंदीतही १०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाची श्रीवल्ली, सामी सामी आणि ऊं अंटावा सारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर (social media) ही सर्व गाणे खूप लोकप्रिय झाली असून मोठी धूम या गाण्यांनी केली आहे.  

सध्या अल्लू अर्जुनच्या या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'पुष्पा २'ची जोरदार तयारी सुरू आहे. या चित्रपटाबाबत अनेक बातम्या येत आहेत, असे म्हटले जात आहे की ज्याप्रमाणे समंथा रुथ प्रभूने चित्रपटातील 'ऊं अंटावा ' हे खास गाणे केले होते, त्याचप्रमाणे या दुसऱ्या भागात बॉलिवूड अभिनेत्री धमाल करताना दिसणार आहे.

ही अभिनेत्री दिशा पटनी असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुष्पा 2 मध्ये दिशाचे खास गाणे असू शकते. इतकंच नाही तर पुष्पा 2 बद्दल अशीही बातमी आली आहे की या चित्रपटाची तीन गाणी तयार झाली आहेत आणि ती रेकॉर्ड करण्यात आली आहेत. चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांचे असून त्यांनी चित्रपटासाठी त्याने तीन गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा भाग पूर्वीपेक्षा अधिक प्रेक्षणीय बनवण्याची तयारी निर्माते करत असून त्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. 

दुसरीकडे, चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना, पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असणार आहे. त्यानंतर पुष्पामधील फहद फासिलची एन्ट्री अप्रतिम होती आणि दुसऱ्या भागात तो नक्कीच पुष्पाची झोप उडवण्याचे काम करताना दिसेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आहेत. पुष्पा 2 2023 मध्ये रिलीज होणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी