Priya Prakash: डोळा मारणाऱ्या प्रिया प्रकाशने आता केले बोल्ड फोटोशूट; हॉट लूकने जुन्या फोटोंना टाकले मागे 

बी टाऊन
Updated Apr 29, 2022 | 10:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

priya prakash bold photoshoot | डोळ्यांनी जादू करणारी प्रिया प्रकाश वारियर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. डोळा मारण्याच्या तिच्या भन्नाट स्टाइलमुळे प्रिया रातोरात स्टार बनली होती.

Priya Prakash has now done a bold photoshoot
डोळा मारणाऱ्या प्रिया प्रकाशने आता केले बोल्ड फोटोशूट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • डोळ्यांनी जादू करणारी प्रिया प्रकाश वारियर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
  • डोळा मारण्याच्या तिच्या भन्नाट स्टाइलमुळे प्रिया रातोरात स्टार बनली होती.
  • सध्या तिचे असेच काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

priya prakash bold photoshoot | मुंबई : डोळ्यांनी जादू करणारी प्रिया प्रकाश (Priya Prakash) वारियर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. डोळा मारण्याच्या तिच्या भन्नाट स्टाइलमुळे प्रिया रातोरात स्टार बनली होती. प्रियाच्या त्या एक्सप्रेशनने लोक इतके प्रभावित झाले की तिची सर्वत्र चर्चा होत होती. (Priya Prakash has now done a bold photoshoot). 

अधिक वाचा : कुंभ राशीत गोचर करणार शनि, दोन राशींना होणार त्रास

यानंतर प्रियाला लोकांनी विंक गर्ल असे संबोधले. प्रियाच्या व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने, एका प्रेमळ अभिनयाने तिने लोकांच्या मनाला भुरळ घातली. लक्षणीय बाब म्हणजे प्रियाच्या या स्टाइलसमोर विवाहित पुरूषही प्रियाच्या स्टाइलवर फिदा झाले. तिच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले. 


सध्या प्रियाचे इंस्टाग्रामवर तब्बल ७.१ दशलक्ष एवढे फॉलोवर्स आहेत. तिने आतापर्यंत ७४३ पोस्ट केल्या असून त्या फोटोंना चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. 

प्रिया प्रकाश सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रियाचे इंस्टाग्राम अकाउंट अनेक विविध प्रकारच्या फोटोंनी भरलेले आहे. अलीकडेच प्रियाने अनेक फोटो पोस्ट केले आहेत, ज्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या अभिनेत्रीची प्रत्येक कला लोकांच्या मनात जागा करत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी