पाहा डोळा मारत एका रात्रीत स्टार झालेल्या प्रिया प्रकाशचा नवा लूक!

बी टाऊन
Updated Apr 20, 2019 | 18:53 IST | टाइम्स नाऊ हिंदी

डोळा मारून एका रात्रीत सुपरस्टार झालेल्या प्रिया प्रकाशचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती साडीत दिसतेय. प्रियाचा हा साडीतील लूक पाहून तिचे फॅन्स घायाळ झाले आहेत.

Priya Prakash Varrier
प्रिया प्रकाश वारियर  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: २०१८मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केली गेलेली मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आपल्या एका व्हिडिओनं एका रात्रीत स्टार बनली होती. तिच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर खूप धमाल उडवली होती. फेब्रुवारी २०१८मध्ये तिचा एक डोळा मारतांनाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता. तो पाहून अनेक लोक तिचे फॅन्स झाले होते. सध्या प्रिया प्रकाशचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये प्रिया साडी नेसलेली दिसत आहे.

प्रियाचा हा साडीतील लूक खूप सुंदर आहे. साडीच्या या लुकमध्ये प्रियाची चांगलीच स्तुती होत आहे. प्रियानं हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. या फोटोलो आतापर्यंत २ लाख ३४ हजारांहून अधिक जणांनी लाईक केलेलं आहे. साडीतील लुकमध्ये प्रिया खूप सुंदर दिसतेय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

प्रिया नेहमी आपल्या लूक मुळं चर्चेत राहते. ती सोशल मीडियावरही नेहमी ऍक्टिव्ह राहते. प्रिया प्रकाशनं वयाच्या १८व्या वर्षीच आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रियानं आपल्या करिअरची सुरूवात मल्याळम चित्रपट ‘ओरु आदर लव’नं केली होती. सध्या प्रिया आपला चित्रपट ‘श्रीदेवी बंगलो’मुळे खूप चर्चेत आहे. ‘श्रीदेवी बंगलो’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. मात्र हा चित्रपट वादात अडकलाय. या चित्रपटात प्रिया सोबत अभिनेता प्रियांशू चॅटर्जी प्रमुख भूमिकेत आहे.

 

 

चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत माम्बुली यांनी केलं आहे. चित्रपट ‘श्रीदेवी बंगलो’ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या आयुष्यावर बनलेला आहे. या चित्रपटात प्रिया प्रकाश श्रीदेवी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात बाथटबचा एक सिन दाखवला गेला आहे, ज्याचा संबंध श्रीदेवी यांच्या मृत्यूशी लावला जात आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

pc: @albert_will.i.am

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

श्रीदेवी यांचे पती निर्माता बोनी कपूर यांनी हा चित्रपट बनवणाऱ्यांना लीगल नोटीस पाठवलीय. या वादावर प्रिया प्रकाशनंही आपली भूमिका मांडली होती. प्रिया म्हणाली, ‘मला नाही वाटत की माझ्या चित्रपटाचा वाद व्हावा. मी नकारात्मकतेपासून दूर राहिल. या मुद्द्यांना सांभाळण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. मी फक्त माझी भूमिका साकारणार आहे, जी मला दिली गेलीय.’

मात्र या चित्रपटाबाबत वाद अजूनही सुरू आहे. प्रियाला आपला हा चित्रपट कधी रिलीज होतो याची वाट पाहत आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या तारखेबाबत अजून कोणतीही घोषणा केली गेली नाहीय. यापूर्वी प्रियाचा चित्रपट ‘ओरु आदर लव’नं बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केली नाही.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पाहा डोळा मारत एका रात्रीत स्टार झालेल्या प्रिया प्रकाशचा नवा लूक! Description: डोळा मारून एका रात्रीत सुपरस्टार झालेल्या प्रिया प्रकाशचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती साडीत दिसतेय. प्रियाचा हा साडीतील लूक पाहून तिचे फॅन्स घायाळ झाले आहेत.
Loading...
Loading...
Loading...