Priyanka chahar choudhary looking for new house: प्रियंका चहर चौधरी बिग बॅास 16 मधील सगळ्या लोकप्रिय सदस्यांपैकी एक आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नसली तरीही प्रियांकाने बिग बॉसच्या घरात राहून अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या प्रियंका मुंबईत राहण्यासाठी घर शोधत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीला स्वतःच्या घराची गरज आहे. ज्यासाठी ती घराच्या शोधात आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिच्याकडे कार नाही तसेच मुंबईत घर पण नाही.
प्रियंका म्हणाली, माझ्याकडे मोबाइल आहे पण कार नाही आणि मुंबईत घर पण नाही. मनोरंजनसृष्टीत स्ट्रगल करण्यासाठी आल्यापासून राहण्याची अडचण आहे. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही घराची अडचण कायम आहे. मुंबईत राहण्यासाठी घराचा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रियंकाने दिली.
प्रियंका फराह खानच्या पार्टीत दिसली होती. बिग बॉस 16 च्या स्पर्धकांसाठी फराह खानने पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी एन्जॉय केल्याचे प्रियंकाने सांगितले. वेळ मजेत गेला. आम्ही म्युझिकचा आनंद घेतला. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांना भेटलो. ही माझ्या पुढील प्रवासाची चांगली सुरुवात आहे, असे प्रियंका म्हणाली.
प्रियंका बिग बॉस 16 सीझनमधील सर्वात बेधडक स्पर्धकांपैकी एक होती. तिच्या निडर वृत्तीमुळे ती तिच्या चाहत्यांना आवडते. प्रियंका आणि अंकित गुप्ता यांच्या बाँडिंगचेही खूप कौतुक झाले.
प्रियंकाची कामगिरी
प्रियंका डंकी, नागिन 7 सारख्या काही बॉलीवूड आणि टीव्ही प्रोजेक्टसाठी चर्चेत असल्याची अफवा आहे.