प्रियंका चोप्रा आणि निक जोनास करत आहेत बाळाचा विचार, वर्षभरात कुटुंब नियोजनाबद्दल बदलले दोघांचे विचार?

बी टाऊन
Updated Dec 14, 2020 | 15:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास आता बाळाचा विचार करत आहेत. मात्र २०१९मध्ये या जोडप्याच्या एका निकटवर्तीयाने वेगळीच माहिती दिली होती असे समोर येत आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास करत आहेत बाळाचा विचार, वर्षभरात कुटुंब नियोजनाबद्दल बदलले दोघांचे विचार?
Priyanka Chopra and Nick Jonas 
थोडं पण कामाचं
  • प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सध्या लंडनमध्ये राहात आहेत
  • प्रियंका आता पुढील वर्षातील आपल्या आगामी चित्रपटासाठी चित्रीकरण करणार आहे
  • सूत्रांनी सांगितले आहे की हे जोडपे लवकरच आपल्या बाळाचा विचार सुरू करणार आहे

न्यूयॉर्क: प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांच्या विवाहाला (marriage) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या प्रियंका चोप्रा आणि निक जोनास लंडनमध्ये (London) राहात आहेत. सोबतच प्रियंका आता आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी (upcoming projects) चित्रीकरणाची (shooting) चालू करणार आहे. याचदरम्यान सूत्रांनी सांगितले आहे की हे जोडपे (couple) लवकरच आपल्या बाळाचा विचार (planning a baby) चालू करणार आहे.

याआधी समोर आली होती वेगळीच माहिती

एका संकेतस्थळाचने दिलेल्या माहितीनुसार प्रियंका आऩि निक लवकरच आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. मात्र याआधी २०१९मध्ये प्रियंका आणि निकच्या निकटवर्तीयाने असे सांगितले होते की या जोडप्यावर मुलाबाबत कोणताही दबाव नाही आणि ते दोघेही व्यावसायिकरित्या प्रतिबद्ध आहेत. या सूत्राने म्हटले होते, ‘प्रियंका आणि निक वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत आणि कामात व्यस्त आहेत. जेव्हा हे व्हायचे असेल तेव्हा होईल या धोरणाने हे जोडपे याबाबत निश्चिंत आहे आणि हा एक प्रकारचा आशीर्वाद आहे.’ मात्र आपल्या बाळाबाबत या जोडप्याच्या विचारांमध्ये गेल्या एक वर्षात बराच फरक पडलेला दिसत आहे.

क्वारंटाईनमध्ये प्रियंकाने दिली निकला साथ

निक जोनासने नुकतेच सांगितले होते की क्वारंटाईनमध्ये त्याची पत्नी प्रियंकाने कसा त्याच्यासोबत वेळ घालवला. तो म्हणाला होता, ‘या सर्व गोष्टीत सर्वात मोठी उलथापालथ तेव्हा झाली जेव्हा आम्ही घरी होतो. जसे आमच्यासोबत एरवी घडत नसे ते सर्व या काळात झाले. कारण गेल्या काही वर्षांपासून प्रोजेक्ट्समुळे आम्ही नेहमीच व्यस्त राहिलो आहोत. पण इथे सर्व उलट घडले, फक्त थोड्याच काळासाठी. आम्हाला आमच्या मुळांशी जोडले जाण्याची संधी मिळाली.’

काय आहेत प्रियंकाचे कामाबाबतचे प्लॅन

प्रियंका चोप्रा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या द व्हाईट टायगर या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत राजकुमार राव पडद्यावर असेल. नेटफ्लिक्सने या दोघांचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. यामुळे चाहते उत्साहित आहेत आणि त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट अरविंद अडिगा यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी