बिकिनीमध्ये दिसली प्रियंका चोपडाची जेठानी, महागड्या रिजॉर्डमध्ये एन्जॉय करताहेत हनीमून 

बी टाऊन
Updated Jul 22, 2019 | 19:41 IST

न्यूली मॅरिड कपल सोफी टर्नर आणि जो जोनस सध्या हनीमून साजरा करत आहे. जो आणि सोफीने नुकतेच आपल्या हनीमू लोकेशनचे फोटो शेअर केले आहे. 

sofi tarnar
सोफी टर्नर आणि जो जोनास  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • जो जोनस आणि सोफी टर्नरने खासगीत चर्चमध्ये दुसऱ्यांदा केले लग्न 
  • सोफी टर्नरने परिधान केलेला रॉयल गाऊन खूप चर्चेत होता
  • सोफीचा हा गाऊन तयार करण्यासाठी सुमारे १०५० तास लागले 

काही दिवसापूर्वी प्रियंका चोपडा हिचा जेठ (नवऱ्याचा मोठा भाऊ) जो जोनासने हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर हिच्याशी लग्न केले. जो जोनस आणि सोफी टर्नर यांनी अत्यंत खासगी पद्धतीने लग्न केले होते. या लग्नात केवळ कुटुंबातील काही खास व्यक्तींचा समावश होता. सध्या हे कपल हनीमून साजरं करत आहे. जो जोनस आणि सोफी टर्नरने नुकतेच आपल्या हनीमून लोकेशनचे फोटो शेअर केले आहे, यात दोघेही खूप रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. 


या शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये सोफी टर्नर ही बिकिनीमध्ये दिसत आहे. सोफी पिंक कलरच्या बिकिनीमध्ये समुद्र किनारी आराम करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत सोफी टर्नर एका बीचजवळ उभी आहे. तर जो जोनस हा फोटोमध्ये बुद्धीबळ खेळताना आणि स्नॅक्स एन्जॉय करताना दिसत आहे. तसेच कधी तो वॉटर स्लाईड एन्जॉय करताना दिसत आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की कपल हे खूपच महागड्या रिजॉर्टमध्ये आपला हनीमून साजरा करत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I found happiness. ??♥️#discoversoneva

A post shared by J O E J O N A S (@joejonas) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Paradise ☀️?✨ such a magical place #discoversoneva

A post shared by Sophie Turner (@sophiet) on

 

सोफी टर्नर आणि जो जोनस यांनी हनीमून लोकेशनवरून काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. यात सोफीने सांगितले की, यावेळी मी फोन जास्त पाहत नाही. यावेळी गेम ऑफ थ्रोन्सची अभिनेत्री या दरम्यान अमेरिकन महिला फूटबॉल संघाबाबत बोलताना दिसली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mr and Mrs Jonas Photo by @corbingurkin

A post shared by Sophie Turner (@sophiet) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

?? me ?

A post shared by Sophie Turner (@sophiet) on

 

जो जोनस आणि सोफी टर्नर बिलबोर्ड म्यूझिक पुरस्कार २०१९ अटेंड करत होते. त्यानंतर त्यांनी चर्चमध्ये जाऊन दुसऱ्यांदा लग्न केले. सोफी टर्नर आणि जो जोनास यांचे लग्न फ्रान्सचा फेसम किल्ला Chateau de Torreau मध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले. लग्नात सोफी टर्नरने जो पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता, त्याची खूप चर्चा झाली. 

सोफीच्या या गाऊनसाठी सुमारे १० एम्ब्रॉयडर्सने काम केले होते. सोफी टर्नरच्या गाऊनसाठी सुमारे १०५० तास लागले होते. या गाऊनचा १४ मीटरचा ट्यूल होता. डिजीटली डिझाइन या गाऊनच्या एका पॅटर्नसाठी ६ लाख पन्नास हजार पेक्षा अधिक टांके होते. वेल बनवण्यासाठी ४८ तास लागले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
बिकिनीमध्ये दिसली प्रियंका चोपडाची जेठानी, महागड्या रिजॉर्डमध्ये एन्जॉय करताहेत हनीमून  Description: न्यूली मॅरिड कपल सोफी टर्नर आणि जो जोनस सध्या हनीमून साजरा करत आहे. जो आणि सोफीने नुकतेच आपल्या हनीमू लोकेशनचे फोटो शेअर केले आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...