अशी साजरी केली प्रियांका चोप्राने पती नीक जोनाससोबत साता समुद्रापार पहिली-वहिली करवा चौथ

बी टाऊन
Updated Oct 18, 2019 | 22:42 IST | चित्राली चोगले

अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या वर्षी बॉयफ्रेंड नीक जोनाससोबत विवाहबंधनात अडकली. नुकतीच या दोघांची पहिली करवा चौथ होती आणि ती या दोघांनी छान साजरी केली. कशी साजरी झाली पिसी-नीकची पहिली करवा चौथ ते पाहा.

priyanka chopra celebrates here first karwa chauth with husband nick jonas at a concert
अशी साजरी केली प्रियांका चोप्राने पती नीक जोनाससोबत साता समुद्रापार पहिली-वहिली करवा चौथ  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • देसी गर्ल प्रियांका चोप्राची पहिली करवा चौथ
  • साता समुद्रापार साजऱ्या केलेल्या करवा चौथचे फोटो केले शेअर
  • निकने देखील फोटो शेअर करत लिहिला खास संदेश

मुंबई: 2017च्या मेट गाला इव्हेन्टमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेता-गायक निक जोनास एकत्र दिसले. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. या एका इव्हेन्टनंतर अनेक वेळा हे दोघं एकत्र दिसायला लागले. हॉलिवूड ते बॉलिवूड या दोघांच्या रिलेशनवर बोललं जाऊ लागलं आणि अखेर १ डिसेंबर २०१८ रोजी हे कपल विवाहबंधनात अडकलं. त्यानंतर या कपलचे एकमेकांच्याबद्दलचे क्यूट पोस्ट कायम पहायला मिळतात. त्यांच्या एकमेकांसाठी असलेल्या पोस्ट कायम लोकप्रिय देखील ठरतात. नुकतीच करवा चौथ सर्वत्र साजरी केली गेली. बॉलिवूडमध्ये या करवा चौथला कायम महत्त्व राहीलेलं आहे. अनेक सेलिब्रिटी करवा चौथ साजरी करताना दिसतात. त्यातंच आपली देसी गर्ल प्रियांकासुद्धा साता समुद्रापार असताना करवा चौथ साजरी करताना दिसली.

 

देसी गर्ल पिसी आणि पती निक जोनास ह्यांची ही पहिली करवा चौथ होती. पिसीसाठी करवा चौथ खूप महत्त्वाची आहे कारण या आधी पण ती अनेकदा म्हणाली आहे की ती लग्नाच्या आधी सुद्धा करवा चौथ साजरी करायची. चांगला नवरा मिळण्यासाठी अनेक अविवाहित मुली हे करवा चौथचं व्रत पाळतात. त्यातंच पिसी सुद्धा हे करायची पण आता लग्नानंतरची तिची पहिली करवा चौथ होती. पिसीने तिच्या पहिल्या करवा चौथचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. करवा चौथमध्ये लाल कपड्यांना महत्त्व असतं. खासकरुन लाल साडी नेसून विवाहित स्त्रिया हे व्रत साजरं करतात. पिसीने सुद्धा छान लाल साडी नेसली होती आणि हे व्रत तिने सॅन डिअगोमध्ये साजरं केलं.

 

 

पती निकचा कॉनर्सट तिथे आहे आणि हे दोघं तिथे हजर आहेत. तेव्हा तिथे दोघांनी करवा चौथ साजरी केली. पती निकसोबतचा एक क्यूट फोटो तिने नुकताच शेअर केला. ज्यासोबत तिने कॅप्शन टाकलं, ‘करवा चौथ जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टच्या इथे, ही पहिली वेळ मला नक्कीच कायम लक्षात राहणार आहे...’ तिने काही वेळाने अजून काही क्यूट फोटो शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिलं, ‘माझं सर्वस्व...’ तिने #KarwaChauth असा हॅशटॅगही वापरला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My everything ❤️ #karwachauth

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

निक आणि पिसीच्या करवा चौथचा फोटो निकने देखील शेअर केला आणि त्याला छान कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमध्ये निकने लिहीलं आहे, ‘माझी बायको भारतीय आहे. ती हिंदू आहे, आणि ती सगळ्याच बाबतीत खूप छान आहे. तिने मला तिच्या धर्म आणि संस्कृतीबद्दल बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तिचा खूप आदर करतो, आणि जसं तुम्ही पाहत आहात आम्ही एकत्र खूप मज्जा करतो. करवा चौथच्या सगळ्यांनी शुभेच्छा...’ नीकच्या या पोस्टवर एक गोड कमेन्ट आली आहे आणि ती आहे पिसीची बहिण अभिनेत्री परिणीती चोप्राची. तिने यावर प्रियांका कशी लग्नाअगोदर करवा चौथ साजरी करायची ते सागंत आता माझी वेळ आहे नवरा मिळण्याची असं मिश्किल पद्धतीत लिहिलं आहे. त्यावर पिसीने सुद्धा तिला होकारार्थी कमेन्ट केली आहे. पिसी आणि निकच्या या करवा चौथच्या पोस्ट त्यांच्या नेहमीच्या पोस्ट्स प्रमाणे खूप लोकप्रिय ठरल्या आहेत.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी