हॉट ड्रेस घालून इव्हेंटला आलेली प्रियंका चोपडा ट्रोलर्सची बळी

बी टाऊन
Updated Jun 05, 2019 | 15:33 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

एक्ट्रेस प्रियंका चोपडा पुन्हा एकदा आपल्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. प्रियंकाच्या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रियंकाच्या ड्रेसवरून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत.

Priyanka Chopra with Nick Jonas
हॉट ड्रेस घालून इव्हेंटला आलेली प्रियंका चोपडा ट्रोलर्सची बळी   |  फोटो सौजन्य: Instagram

Priyanka Chopra dress: बॉलिवूड एक्ट्रेस प्रियंका चोपडानं पती  निक जोनससोबत जोनस ब्रदर्सच्या नवीन डॉक्युमेंट्री चेसिंग हॅपीनेस ( (Chasing Happiness)च्या वर्ल्ड प्रीमियरला हजेरी लावली. हा प्रीमियर सोमवारी लॉस एंजेलिसमध्ये झाला. यावेळी संपूर्ण जोनस कुटुंबाला एकत्र स्पॉट करण्यात आलं. मात्र यावेळी प्रियंका चोपडाच्या ड्रेसची बरीच चर्चा रंगली. 

खरंतरं प्रियंका खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घालून प्रीमियरला पोहोचली होती. प्रियंकानं थाय हाय स्लिट प्लंगिन नेकलाइन ड्रेस घातला होता. यात प्रियंकानं चेन असलेला बॉडीसूट घातला.  त्यासोबतच तिनं डायमंड इयररिंग्स घातले आणि केस मोकळे सोडले होते. मेकअपबद्दल बोलायचं झाल्यास प्रियंकानं न्यूड मेकअप करत ब्राऊन आय मेकअप केला.या लूकमध्ये प्रियंका खूप सुंदर दिसत होती. मात्र प्रियंकाचा हा लूक लोकांच्या पसंतीस उतरला नाही. 

प्रियंकाच्या या फोटोंवर सोशल मीडियावर तिची थट्टा मस्करी केली जात आहे. लोकांचं म्हणणं आहे की, प्रियंकाचा हा ड्रेस बिल्कुल ही चांगला नाही आहे. ती यात सुंदर दिसत नाही आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की, प्रियंका सतत यंग दिसण्यासाठी या प्रकारचे प्रयत्न करत असून तसे कपडे घालत आहे. 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रियंकाला तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वी मेट गाला या कार्यक्रमाला पोहोचलेल्या प्रियंका ट्रोलर्सची बळी ठरली होती. त्यावेळी तिच्या ड्रेस आणि मेकअप वरून यूजर्संनी तिला ट्रोल केलं होतं. या लूकचे सोशल मीडियावर बरेच मीम्स देखील बनवण्यात आले होते.यावेळी मेट गालाची थीम ही 'कॅम्प: नोट्स ऑन फॅशन' अशी होती. या थीमुळेच प्रियंकाने डियॉरने डिझाइन केलेला सॉफ्ट पेस्टल गाऊन परिधान केला होता. थाय हाय स्लिट हा गाऊन तिने शिमरी टाइट्ससोबत परिधान केला होता. तिच्या या गाऊनमध्ये गुलाबी आणि पिवळे फेदरही लावण्यात आले होते.  तिचा हा अतिशय वेगळा लूक आणि आऊटफिट पाहून तिच्यावर एकापेक्षा एक सरस असे मीम्स तयार करण्यात आले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Met 2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

CAMP: Notes on Fashion #MetGala2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास प्रियंका सोनाली बोसचा सिनेमा द स्काय इज पिंक मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या सिनेमात तिच्या व्यतिरिक्त फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील दिसतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हॉट ड्रेस घालून इव्हेंटला आलेली प्रियंका चोपडा ट्रोलर्सची बळी Description: एक्ट्रेस प्रियंका चोपडा पुन्हा एकदा आपल्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. प्रियंकाच्या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रियंकाच्या ड्रेसवरून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles