देसी गर्ल प्रियंका चोपडाच्या या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल अवाक, पाहा PHOTOS

बी टाऊन
Updated Jan 16, 2020 | 19:28 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Priyanka Chopra: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा केवळ आपल्या अभिनयामुळेच नाही तर फॅशनसेंसमुळे सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे. नुकतेच प्रियंकाचा एक नव्या ड्रेसमधील फोटो चर्चेत आला आणि त्याची किंमत तब्बल...

priyanka chopra dress price nick jonas viral photos bollywood entertainment news marathi google
देसी गर्ल प्रियंका चोपडाच्या या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल अवाक  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • प्रियंका चोपडाच्या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल अवाक 
  • प्रियंकाच्या महागड्या ड्रेसची होतेय जोरदार चर्चा 
  • महागड्या ड्रेसमधील प्रियंकाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल 

देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोपडाचा नव्या ड्रेसमधील एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे. या ड्रेसची किंमत ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा नेहमीच चर्चेत असते. आता प्रियंका चोपडा चर्चेत आहे ती तिने परिधान केलेल्या महागड्या ड्रेसमुळे. प्रियंकाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Priyanka yesterday in LA #priyankachopra

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on

सोशल मीडियात प्रियंका आपल्या लूक, ड्रेस, फॅशनने सर्वांना आपल्याकडे आकर्षित करत असते. आला पती निक जोनास याच्यासोबत असो किंवा रेड कार्पेटवर असो प्रियंका आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांची मनं जिंकते. नुकतेच प्रियंकाचे काही फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या फोटोजमध्ये प्रियंका आपला पती निक जोनास याच्यासोबत दिसत आहे. प्रियंकाने एक बरोको रोडियो प्रिंट स्लीवलेस ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर व्हाईट बेस आणि वर्साचे प्रिंट डिझाईन बनवण्यात आलेली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Priyanka and Nick yesterday #priyankachopra #nickjonas

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on

प्रियंकाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या ड्रेसची किंमत (USD 1450) म्हणजेच जवळपास 1,03,581 भारतीय रुपये इतकी आहे. प्रियंका चोपडा नेहमीच ब्रँडेड, स्टायलिश आणि फॅशनेबल ड्रेस परिधान करत असते. प्रियंकाचं वॉर्डरोब महागड्या आऊटफिटने संपूर्ण भरलेला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Priyanka and Nick yesterday #priyankachopra #nickjonas

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on

प्रियंकाच्या या आऊटफिटचं बोलायचं झालं तर यावर प्लझिंग नेकलाईन आणि समोर थायवर हाय स्लीट कट डिझाइन बनवण्यात आली आहे. या ड्रेसवर प्रियंकाने ब्लॅक कलरचा डॅकेट परिधान केला आहे. यामुळे प्रियंकाचा लूक आणखीनच खास बनत आहे. सोबतच प्रियंकाने हिल्स आणि हातात क्लच कॅरी केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Priyanka yesterday in LA #priyankachopra

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Priyanka and Nick yesterday #priyankachopra #nickjonas

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on

वर्कफ्रंटचं बोलायचं झालं तर प्रियंका लवकरच वेब सीरिजमध्ये भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये अभिनेता राजकुमार रावच्या अपोझिट प्रियंका दिसणार आहे. वेब सीरिजसोबतच प्रियंका इतरही प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी