अभिनेत्री प्रियंका चोपडाने आखला बँक लुटण्याचा प्लान, महाराष्ट्र पोलिसांनी दिलं असं उत्तर

बी टाऊन
Updated Sep 11, 2019 | 19:03 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

The Sky is Pink: द स्काय इज पिंक या सिनेमातून देसी गर्ल प्रियंका चोपडा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. या सिनेमात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा

Priyanka Chopra
अभिनेत्री प्रियंका चोपडा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • देसी गर्ल प्रियंका चोपडाला बँक लुटण्याचा प्लान पडला महागात
  • महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट करुन प्रियंकाला दिलं उत्तर
  • पोलिसांनी केलेल्या ट्विटवर प्रियंका चोपडाने म्हटलं 'Oops caught red handed'

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) यांचा आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक' (The Sky is Pink) चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच त्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, याच सिनेमाच्या ट्रेलरमुळे महाराष्ट्र पोलिसांनी गंभीर दखल घेत एक ट्विटही केलं आहे.

द स्काय इज पिंक या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री प्रियंका चोपडा डायलॉग बोलते की, 'एकदा आयशा ठिक होऊ दे मग दोघे मिळून बँक लुटूया'. प्रियंका चोपडाचा हा डायलॉग सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे आणि यावर महाराष्ट्र पोलिसांनीही एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांनी प्रियंका चोपडा आणि फरहान अख्तर यांच्या या डायलॉगचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर करत म्हटलं, 'जर तुम्ही असं कृत्य केलं तर तुम्हाला आयपीसीच्या कलम ३९३ अंतर्गत सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होईल'.

महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या ट्विटवर प्रियंका चोपडाने सुद्धा रिप्लाय केला आहे. प्रियंका चोपडाने महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटला रिप्लाय देत म्हटलं, "उप्स आपण रंगेहात पकडलो गेलो, आता प्लान बी अॅक्टिव्हेट करण्याची वेळ आली आहे".

केवळ प्रियंका चोपडाच नाही तर फरहान अख्तरने सुद्धा यावर ट्विट करत म्हटलं, "पुन्हा कॅमेऱ्यासमोर दरोडा टाकण्याची योजना करणार नाही".

देसी गर्ल प्रियंका चोपडा, फरहान अख्तर आणि जायरा वसीम स्टारर द स्काय इज पिंक हा सिनेमा येत्या ११ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. द स्काय इज पिंक या सिनेमात एका गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या टीनएज मुलीची आणि तिच्या आई-वडिलांची कहाणी दाखवण्यात आली आहे. सिनेमात प्रियंका चोपडा या मुलीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे तर फरहान अख्तर तिच्या वडिलांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी