प्रियंका चोप्राला मिळाली होती गँगरेपची धमकी, सोपा नव्हता हॉलिवूडचा प्रवास

बी टाऊन
Updated Feb 24, 2021 | 13:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूडची देसी गर्ल म्हटल्या जाणाऱ्या प्रियंकाने आज जगभरात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. तिचे फॅन्स केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत.

Priyanka chopra
प्रियंका चोप्राला मिळाली होती गँगरेपची धमकी 

थोडं पण कामाचं

  • प्रियंका चोप्रा सध्या चर्चेत आहे. तिचे पुस्तक अनफिनिश्ड रिलीज झाले आहे. 
  • हे पुस्तक सुरूवावतीपासूनच चर्चेतआहे. यात तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
  • प्रियंका चोप्राचा हा प्रवास काही सोपा नव्हता.

मुंबई: बॉलिवूडची देसीगर्ल म्हटली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राने(priyanka chopra) आपले नाणे केवळ बॉलिवूडच(bollywood) नव्हे तर हॉलिवूडमध्येही(hollywood) खणखणीत वाजवले आहे. तिचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. प्रियंका चोप्रा अशा फार कमी अभिनेत्रींपैकी आहे जिने हॉलिवूडपर्यंतचा प्रवास कला आहे. बिगरफिल्मी दुनियेतून आलेल्या प्रियंका चोप्राने आपली मेहनत आणि सातत्याच्या जोरावर हे यश मिळवले आहे. 

आज तिला जे स्टारडम मिळाले ते मिळावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. दरम्यान, प्रियंका चोप्राचा हा प्रवास काही सोपा नव्हता. तिच्या जीवनात तिने खूप संघर्ष पाहिला. प्रियंकाला या प्रवासादरम्यान कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला याचा खुलासा तिने स्वत: केलाय. 

मिळाली होती गँगरेपची धमकी

प्रियंका चोप्राने आपले पुस्तक UNFINISHEDमध्ये सांगितले की तिला लोकांनी आपल्या देशात परतण्यासोबतच घाणेरड्या कमेंटही केल्या होत्या. तिला ब्राऊन दहशतवादी म्हटले गेले होते. प्रियंका सांगते की तिला सांगितले गेले होते की मिडल ईस्टमध्ये परत ये आणि बुरखा घाल. इतकंच नव्हे तर तिला गँगरेपची धमकीही देण्यात आली होती.

पुस्तकात केलेत अनेक खुलासे

प्रियंका चोप्रा सध्या तिच्या पुस्तकामुळे खूप चर्चेत आहे. हे पुस्तक पहिल्यापासूनच चर्चेतआहे.या पुस्तकात तिने अनेक खुलासे केले आहेत. हे खुलासे साऱ्यांनाच हैराण करणारे आहेत. प्रियंका चोप्राचे हे पुस्तकम्हणजे तिच्या सघंर्षाची ही कहाणी आहे. तिने कशा प्रकारे हे यश मिळवले हे सारे तिने या पुस्तकात मांडले आहे.प्रियंकाने या पुस्तकाद्वारे तिने आपले आयुष्य खोलले आहे. 

निक आणि आपल्या वयाच्या फरकावरही केलेय भाष्य

प्रियंकाने २०१८मध्ये अमेरिकन सिंगर निक जोनासशी लग्न केले होते. निक जोनास प्रियंकापेक्षा ११ वर्षांनी लहान आहे आणि दोघांच्या वयातील अंतरावरून खूप वादही झाला होता. या वयाच्या फरकावरही प्रियंकाने या पुस्तकात भाष्य केले आहे. तिने लिहिले की, निकसोबतचे तिचे नाते हे अॅडव्हेंचरवाले राहिलेआहे. एकमेकांची पसंत ना नापसंत समजून घेतले आहे. निक आणि तिच्या वयामुळे त्यांच्यात कधीही कोणता त्रास झाला नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी