Priyanka Chopra: चोरीचे कपडे घालून फिरायला बाहेर पडली प्रियंका, पाहा प्रियंकाला कुणाचे कपडे चोरायला येते मजा

बी टाऊन
Updated Oct 23, 2020 | 16:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूडमध्ये देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रियंका चोपडा नुकतीच आपला पती निक जोनासचे कपडे घालून फिरताना दिसली होती. तिने ही गोष्ट स्वीकारली आहे की ती अनेकदा असे करते.

Priyanka Chopra
Priyanka Chopra: चोरीचे कपडे घालून फिरायला बाहेर पडली प्रियंका, कुणाचे कपडे चोरायला येते मजा 

थोडं पण कामाचं

  • प्रियंकाने स्वतःच पोस्ट केला निकच्या कपड्यातला फोटो
  • प्रियंकाने घेतले हे सोशल मीडिया चॅलेंज
  • ‘द व्हाईट टायगर’मध्ये दिसणार प्रियंका चोपडा

Priyanka Chopra: बॉलिवूडमध्ये (Bollywood) देसी गर्ल (Desi Girl) म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री (famous actress) प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) सध्या परदेशात आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी तिने अमेरिकन गायक (American singer) निक जोनासशी (Nick Jonas) विवाह केला. त्यानंतर ती भारतात कमी वेळा आली आहे आणि अमेरिकेत स्थायिक (settled in the USA) झाली आहे. पण ती नेहमीच आपले फोटो (photos) आणि सोशल मीडियावरील पोस्ट्समधून (social media posts) आपल्या चाहत्यांच्या संपर्कात (connected with fans) राहते. प्रियंका आपल्या खासगी आयुष्यात (private life) खूपच मिश्किल स्वभावाची आणि खूश राहणारी आहे. ती नेहमीच असे काही ना काही करत असते ज्यामुळे तिच्या आयुष्यात रोमांच राहतो.

प्रियंकाने स्वतःच पोस्ट केला निकच्या कपड्यातला फोटो

नुकतीच प्रियंका आपला पती निक जोनासचे कपडे घालून फिरताना दिसली आहे. प्रियंकाने स्वतःच हा फोटो पोस्ट केला आहे आणि सांगितले की, ती अनेकदा निकचे कपडे चोरते आणि वापरते. प्रियंका चोपडाने इंस्टाग्रामच्या आपल्या स्टोरीत मजेदार फोटो पोस्ट केले आहेत. एक फोटो निक जोनासचा आहे ज्यात तो प्रियंकाने घातलेल्याच पोषाखात दिसत आहे. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘निक जोनास, तुझे कपडे चोरण्यात खूप मजा येते.’

प्रियंकाने घेतले हे सोशल मीडिया चॅलेंज

सध्या सोशल मीडियावर ‘How It Started and How It’s Going’ हे चॅलेंज गाजत आहे. प्रियंकाने हे चॅलेंज घेत हे मजेदार फोटो पोस्ट केले आहेत आणि निकचे कपडे चोरल्याची गोष्ट स्वीकारली आहे. प्रियंका सध्या जर्मनीत आहे आणि हा फोटो तिथेच काढण्यात आला आहे.

‘द व्हाईट टायगर’मध्ये दिसणार प्रियंका चोपडा

प्रियंका चोपडा लवकरच राजकुमार रावसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटात हे दोघे एकत्र दिसू शकतात. बऱ्याच काळापासून या चित्रपटाची चर्चा रंगत होती आणि आता नेटफ्लिक्सने या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. यामुळे चाहते बरेच उत्साहित आहेत आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल उत्सुकता आहे. हा चित्रपट अरविंद अडिगा यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी