प्रियंका चोप्राच्या पतीने मोबाईलवर कुणाचा ठेवलाय वॉलपेपर?

बी टाऊन
Updated May 20, 2019 | 14:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

‘मेट गाला २०१९’ नंतर कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ मध्ये आपल्या दमदार वॉकनंतर अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि निक जोनास परतले आहेत. हे दोघं आता कुठे गेले, याबाबत प्रियंकानं इंस्टाग्रामवर माहिती दिलीय. जाणून घ्या....

Priyanka Chopra and Nick Jonas
प्रियंका आणि निक कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतले  |  फोटो सौजन्य: Instagram

न्यूयॉर्क: अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोन्स या रोमँटिक कपलला आता प्रेक्षकाची बरीच पसंती मिळू लागली आहे. नुकताच या दोघांचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रियंका-निकच्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या केमेस्ट्रीबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे. यातच निकचा मोबाईल वॉलपेपर आता समोर आला आहे. प्रियंका आणि निक हे कान्स फिल्म फेस्टिव्हल आटोपून शनिवारी परतले आहेत.

प्रियंका-निकचा एक फोटो सध्या समोर आला आहे. या फोटोमध्ये प्रियंकानं बेज ट्रेंच कोट घालून त्याखाली फ्लेरेड बॉटम पँट घातली आहे. प्रियंका या लूकमध्ये खूप सुंदर दिसते आहे. आपल्या ड्रेसअप सोबत तिनं सनग्लास लावला आहे. ज्यामुळं तिचा लूक खूपच भारी दिसतोय. तर निक जोन्सनं लाल रंगाचा ट्राऊझर आणि ब्राऊन कलर राऊंड नेकचा टी-शर्ट घातला आहे. दोघांचा हा फोटो कान्स फिल्म फेस्टिव्हल आटोपून हॉटेलमधून बाहेर पडतानाचा आहे.

यावेळी दोन्ही कलाकारांनी फोटोग्राफर्सना अनेक पोझ दिल्या. याच दरम्यान, निकच्या मोबाईल वॉलपेपर समोर आला आहे. यावेळी त्याच्या वॉलपेपरवर त्यानं आपली पत्नी प्रियंकाचा फोटो ठेवलेला दिसून आला.

निकनं आपल्या मोबाईल फोनवर वॉलपेपरवर म्हणून जो फोटो ठेवलाय. तो प्रियंका-निकच्या लग्नातील फोटो आहे. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं प्रियंका-निकचं गेल्या वर्षी लग्न झालं होतं. त्यातील ख्रिश्चन पद्धतीत झालेल्या लग्नाचा फोटो निकनं आपल्या मोबाईलवर वॉलपेपर म्हणून ठेवला आहे.

देसी गर्ल प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. नुकतेच तिनं कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ चे आपले काही फोटो शेअर केले आहेत. प्रियंकानं यंदा कान्समध्ये आपल्या स्टाईल आणि फॅशननं प्रेक्षकांची मनं जिंकली. कान्समधील प्रियंका-निकचा रोमँटिक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. प्रियंकाचा मेट गाला २०१९ मधील लूक मात्र प्रेक्षकांना भावला नव्हता. त्यावरून तिला ट्रोलही केलं गेलं होतं. पण कान्समधील लूकनं ती कसर भरून काढली.

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रियंका अनेक वर्षांनंतर आता बॉलिवूडमध्ये पुन्हा दिसणार आहे. ‘द स्काय इज पिंक’ नावाच्या चित्रपटात प्रियंका अभिनेता फरहान अख्तर बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल. प्रियंकाला पुन्हा एकदा बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी तिचे फॅन्स आतूर आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
प्रियंका चोप्राच्या पतीने मोबाईलवर कुणाचा ठेवलाय वॉलपेपर? Description: ‘मेट गाला २०१९’ नंतर कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ मध्ये आपल्या दमदार वॉकनंतर अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि निक जोनास परतले आहेत. हे दोघं आता कुठे गेले, याबाबत प्रियंकानं इंस्टाग्रामवर माहिती दिलीय. जाणून घ्या....
Loading...
Loading...
Loading...