प्रियंका- निकनं पटकावला हा अॅवॉर्ड, विजेता ठरणारं पहिलं कपल 

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Sep 05, 2019 | 12:32 IST

बॉलिवूड एक्ट्रेस प्रियंका चोपडा आणि तिचा पती निक जोनसनं पीपल मॅगझीनचं Best Dressed of the Year 2019 चं अॅवॉर्ड जिंकलं आहे. याची घोषणा बुधवारी झाली.

Priyanka Chopra with Nick Jonas
प्रियंका- निकनं पटकावला हा अॅवॉर्ड, विजेता ठरणारं पहिलं कपल   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड एक्ट्रेस प्रियंका चोपडा जोनस आणि तिचा पती निक जोनस नेहमीच चर्चेत असतात.
  • प्रियंका आणि निकनं पीपल मॅगझीचं बेस्ट ड्रेस्ड ऑफ द ईयर २०१९ चा अॅवॉर्ड पटकावला आहे.
  • या अॅवॉर्डची घोषणा बुधवारी करण्यात आली.
  • लेडी गागा, जेनिफर लोपेज, सेलिना डियोन, सेरेना विलियम्स आणि बिली पोर्टर यांचा नावाचा समावेश आहे. 

बॉलिवूड एक्ट्रेस प्रियंका चोपडा जोनस आणि तिचा पती निक जोनस नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचे फोटो कधी सोशल मीडिया व्हायरल होत असतात तर कधी दोघं आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत येतात. पण आता दोघं पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते एका चांगल्या गोष्टीसाठी. 

प्रियंका आणि निकनं पीपल मॅगझीचं बेस्ट ड्रेस्ड ऑफ द ईयर २०१९ चा अॅवॉर्ड पटकावला आहे. या अॅवॉर्डची घोषणा बुधवारी करण्यात आली. ही पहिलीच वेळ आहे की, कोणत्या तरी कपल हा विजेता घोषित केलं आहे. या यादीत सुपर स्टायलिश सेलेब्सचं नावं देखील समाविष्ठ आहे. ज्यात लेडी गागा, जेनिफर लोपेज, सेलिना डियोन, सेरेना विलियम्स आणि बिली पोर्टर यांचा नावाचा समावेश आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sometimes u just have to sneak it in!! @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

? #Cannes2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंका आणि निक यांना बऱ्याच इव्हेट्स आणि कार्यक्रमात एकत्रित स्पॉट करण्यात आलं आहे. दोघंही कान्सपासून ते मेट गालापर्यंत एकत्र स्पॉट केलं गेलं आणि त्यावरून बऱ्याच चर्चा देखील झाल्या. मेट गालामधील प्रियंकाचा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. प्रियंकाला तिच्या लूकवरून बरंच ट्रोल देखील करण्यात आलं होतं आणि तिच्या लूकवरून बरेच मिम्स समोर आले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It’s in the air.. /a>

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंका आणि निकचं राजस्थानमधील जोधपूरमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झालं होतं. जोधपूरच्या उमेद भवनमध्ये त्यांचे लग्न झाले ज्याची खूप चर्चा झाली होती. हे लग्न तीन दिवस चालले ज्यामध्ये त्यांनी ख्रिश्चन आणि हिंदू  पद्धतीनं लग्न केलं. त्यांच्या लग्नाबरोबरच दोघेही त्यांच्या वयातील फरकामुळेही चर्चेत होते. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, प्रियंका बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. आता ती द स्काय इज पिंक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या सिनेमात प्रियंका अॅक्टर फरहान अख्तर आणि जायरा वसीमसोबत स्क्रिन  शेअर करताना दिसेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी