Priyanka Chopra-Nick Jonas लंडनच्या रस्त्यावर झाले रोमँटिक, लिप लॉक सीनचे फोटो व्हायरल

बी टाऊन
Updated Apr 14, 2023 | 16:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Priyanka Chopra- Nick Jonas: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सर्वात फेमस सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. अलीकडेच हे कपल त्यांची लाडकी मुलगी मालती मेरीसोबत भारतात आले होते. यादरम्यान दोघेही मुंबई NMACC कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर, कपलने लंडनमध्ये इस्टर साजरा केला.

Priyanka Chopra Nick Jonas romantic lip-lock scene on the streets of London goes viral
Priyanka Chopra-Nick Jonas लंडनच्या रस्त्यावर झाले रोमँटिक  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सर्वात फेमस सेलिब्रिटी
  • कपलने लंडनमध्ये इस्टर साजरा केला.
  • प्रियांका आणि निकचा कारमध्ये बसण्यापूर्वी लिप लॉक सीन

Priyanka Chopra- Nick Jonas Lip Lock Pic: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सर्वात फेमस सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. अलीकडेच हे कपल त्यांची लाडकी मुलगी मालती मेरीसोबत भारतात आले होते. यादरम्यान दोघेही मुंबई NMACC कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर, कपलने लंडनमध्ये इस्टर साजरा केला. दुसरीकडे, बुधवारी प्रियांका आणि निक लंडनच्या रस्त्यावर मस्ती करताना दिसले. यावेळी दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसले. लंडनच्या रस्त्यावरील लिप लॉकचे फोटो इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. (Priyanka Chopra Nick Jonas romantic lip-lock scene on the streets of London goes viral)

प्रियांका आणि निकचा लिप लॉक सीन

एका फॅन क्लबने प्रियांकाच्या लंडनमध्ये पती निकसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, प्रियांका चोप्रा गुलाबी रंगाची हुडी आणि मॅचिंग पॅंट घातलेली दिसत आहे. तर निक काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. त्याने कूल ब्लॅक सनीसह लूक पूर्ण केला आहे. एका फोटोत निक आणि प्रियांका कारमध्ये बसण्यापूर्वी एकमेकांना लिप-लॉक करताना देखील क्लिक झाले होते. या कपलचे हे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

 अधिक वाचा: Priyanka Chopra on bollywood :बॉलिवूडमध्ये काम केलं नाव केलं; मग प्रियंका चोपडानं आता का केली टीका


या कपलचा रोमान्स पाहून चाहत्यांमध्ये उत्साह

सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच, फॅन्सही कपलचा रोमान्स पाहून उत्साही दिसले. एका चाहत्याने, "या दोन लव्हबर्ड्सला एकत्र पाहून खूप आनंद झाला." अशी कमेंट केली, "वॉव हॉट ​​किस!! या लव्हबर्ड्सला पाहून आनंद झाला.", "लव्ह बर्ड्स, नेहमी एकत्र." अशा आशयाच्या इतर कमेंट्स या फोटोवर दिसत आहेत.

 अधिक वाचा: KD च्या सेटवर अपघात, बॉम्ब सीनदरम्यान Sanjay dutt जखमी, शूट थांबवावं लागलं

प्रियांका चोप्रा वर्क फ्रंट 

प्रियांका सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल' या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या मालिकेत ती रिचर्ड मॅडनसोबत दिसणार आहे. अभिनेत्रीने तिच्या भारत प्रवासादरम्यान मुंबईत या मालिकेचे प्रमोशनही केले. तिने तिच्‍या बी-टाउन फ्रेंडस् आणि मीडियासाठी स्‍पेशल प्रीमियर नाईटचे आयोजन केले होते. ही मालिका 28 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. याशिवाय ती लवकरच आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत 'जी ले जरा' या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी